Vijay Wadettiwar On Milind Deora: मिलिंद देवरा निवडून येणे तर दूरच, त्यांना साधे तिकीटही मिळणार नाही; विजय वडेट्टीवारांचा विश्वास
Vijay Wadettiwar: पक्षाने सर्व काही देऊन देखील त्यांची कृती म्हणजे नैतिकता आणि नितीमत्ता संपुष्टात आणणारी असल्याची प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी बोलतांना व्यक्त केला आहे.
चंद्रपूर: काँग्रेसची (Congress) भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वात सुरुवात होत आहे. अशातच मुंबईत (Mumbai Politics) मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार आणि पक्षाचे वरच्या फळीतील प्रबळ नेते मिलिंद देवरा ((Milind Deora)) यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मुंबईत काँग्रेसला मोठं खिंडार पडल आहे. यावर काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठे भाकीत करत पक्षाने सर्व काही देऊन देखील त्यांची कृती म्हणजे नैतिकता आणि नितीमत्ता संपुष्टात आणणारी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. खासदारकीच्या मोहापायी त्यांनी काँग्रेस सोडली आहे. मात्र ते ज्या जागेसाठी आग्रही आहेत, त्या ठिकाणाहून मिलिंद देवरा निवडून येणे तर दूर, त्यांना साधे तिकीटही मिळणार नाही. असा विश्वास विजय वडेट्टीवारांनी बोलतांना व्यक्त केला आहे. ते चंद्रपूर येथे बोलत होते.
मिलिंद देवरा हे परत खासदार होणार नाहीत
मिलिंद देवरा आणि त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांच्या सोबत फार जून नाते आहे. पक्षाने त्यांना सर्वकाही दिले आहे. एखाद्या वेळी केवळ खासदारकीच्या लोभापाई त्यांनी असा निर्णय घेतला आहे. हे अतिशय चुकीचे आणि दुर्दैवी आहे. मात्र मी विश्वासाने सांगतो मिलिंद देवरा हे परत खासदार होणार नाहीत. ते ज्या जागेसाठी पक्ष सोडून गेलेत, त्या दक्षिण मुंबईवर ठाकरे गटाच्या शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे अशा स्थितीत असा निर्णय घेणे आणि पक्षाला धोका देणे म्हणजे, अतिशय चुकीचे आहे. मी पूर्ण विश्वासाने सांगतो, ज्या जागेसाठी ते आग्रही आहेत, त्या ठिकाणाहून मिलिंद देवरा निवडून येणे तर दूर, त्यांना साधे तिकीटही मिळणार नाही. असा विश्वास विजय वडेट्टीवारांनी बोलतांना व्यक्त केला आहे.
बेईमानी फारकाळ टिकत नाही- विजय वडेट्टीवार
एकीकडे पक्षाच्या नावावर सगळं मिळवणे आणि दुसरीकडे अशी कृती करणे हे नैतिकता आणि नितीमत्ता संपुष्टात आणण्याचे काम आहे. मला खात्री आणि पूर्ण विश्वास आहे त्यांना तिथून तिकिटच मिळणार नाही. कारण दक्षिण मुंबईची जागा पाडून घेऊ इच्छित असले तरी याला भाजपचा विरोध होईल. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या भांडणात कॉँग्रेस आणि भाजप दोघेही झीरो होतील. हे मी विश्वासाने सांगू शकतो. ज्यांना सर्व मिळाले त्यांनी आज बेईमानी केली आहे आणि बेईमानी फारकाळ टिकत नाही. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :