एक्स्प्लोर

Nagpur News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची खांदेपालट; संयोजकांनाही केलं पदावरून दूर

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघात मोठे बदल करण्यात आले आहे. यात सर्व बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख यांना पदावरून दूर करण्यात आले आहे.

Nagpur News नागपूर लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) रणसंग्राम संपला आहे. आता पुढच्या दोन ते तीन महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच नागपुरातील दक्षिण-पश्चिम नागपूर म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघात मोठे बदल करण्यात आले आहे. यात सर्व बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. तसेच संयोजकांनाही पदावरून दूर करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तर आगामी दिवसात लवकरच नवीन बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्रप्रमुख जाहीर केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.  

गटबाजी केल्यास कठोर कारवाई, भाजपचा पदाधिकाऱ्यांना तंबी वजा इशारा

दक्षिण-पश्चिम नागपूर या विधानसभा क्षेत्रासंदर्भात भाजपची एक महत्त्वाची बैठक काल पार पडली. त्यामध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी गटबाजी करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल अशी तंबी वजा इशारा ही देण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला नागपूरसह विदर्भात अपेक्षेप्रमाणे यश न आल्याने भाजप आता सावध पवित्रा घेत विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे.  

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील हालचालींना वेग 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला अपेक्षेप्रमाणे आघाडी मिळाली नव्हती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा केवळ एक लाख 37 हजार मतांनी विजय झाला असला तरी भाजपला जास्त मताधिक्याची अपेक्षा होती. नुकतेच पश्चिम विधानसभा  मतदारसंघात पक्षातील बुथ प्रमुख आणि शक्ती प्रमुखांना पदावरून दूर करण्यात आलं होतं आणि नवीन व्ह्यू रचना रचल्या जाईल, असे सांगण्यात आलं होतं. अशातच काल दक्षिण पश्चिम जो मतदारसंघ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असून, या मतदारसंघात देखील असेच फेरबदल करण्यात आले आहे. 

पक्षातील सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख आणि काही संयोजक यांना पदावरून दूर होण्यास सांगितले आहे. तर आगामी काळात लवकरच त्यातील रचनात्मक बदल करण्यात येईल, असे देखील सांगण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटल्याचे  समोर आले होते. त्याच अनुषंगाने भाजप पक्षाने देखील सावध पवित्रा घेतलेला आहे. भाजप पक्षात जर कोणी गटबाजी केल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे देखील पक्षाकडून सांगण्यात आला आहे.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Bomb Blast News: 'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
Delhi Red Fort Blast: लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
Temperature Update: महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi Bhutan Visit: चौथ्या राजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त PM Modi भूतानमध्ये, काँग्रेसची टीकेची झोड.
Delhi Blast: दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, सुरक्षेसाठी Lal Qila तीन दिवस बंद
Sambhajingar Alert : दिल्ली स्फोटानंतर संभाजीनगरमध्ये धाकधूक, रेल्वे स्टेशनवर कडेकोट बंदोबस्त
Delhi Blast : छिन्नविछिन्न मृतदेहाचे शवविच्छेदन पूर्ण, पोलिसांची माहिती
Umar Borthers Exclusive: आम्हाला माहित नाही, आरोपी Dr. Umar च्या चुलत भावाची मागणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Bomb Blast News: 'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
Delhi Red Fort Blast: लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
Temperature Update: महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
महाराष्ट्रात हुडहुडी! विदर्भ - मराठवाड्यात कडाक्याची थंडी, पुढील 4 दिवस तापमान कसे राहणार?
Unmesh Patil: गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
गिरीश महाजनांचा दावा अन् ठाकरे गटाच्या नेत्यावर तीनच दिवसात गुन्हा दाखल; बँकेची तब्बल पाच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
BMC Election Reservation: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महिलांसाठी 114 वॉर्ड राखीव; SC, ST साठी कोणते वॉर्ड आरक्षित?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या वॉर्डात आरक्षण? यादी जाहीर, तुमच्या वॉर्डात काय झालं?
Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोटासाठी खतांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अमोनिअम नायट्रेटचा वापर, गाडी लाल सिग्नल दिसताच थांबली अन् धडाम्....
दिल्ली स्फोटासाठी खतांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अमोनिअम नायट्रेटचा वापर, गाडी लाल सिग्नल दिसताच थांबली अन् धडाम्....
Embed widget