Vidhan Parishad : ठाकूरांची राऊतांवर टीका, क्षितीज ठाकूर मतदानाला येण्याची आशा धुसर
Vidhan Parishad Election Maharashtra 2022 : राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली.
Vidhan Parishad Election Maharashtra 2022 : राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी आमदार क्षितिज ठाकूर न्यूयॉर्कला गेल्याच सांगण्यात आले. त्यामुळे ते विधानपरिषदेत मतदान करण्याची आशा धुसर असल्याचं हितेंद्र ठाकूरांनी स्पष्ट केलं. घोडेबाजारीचा आरोप आमच्यावर करतात मग मतं नाही केलं तर चालेल असेही सांगत, अपत्यक्षरित्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टिका केली. राज्यसभा निवडूण निकालानंतर संजय राऊत यांनी हितेंद्र ठाकूरांवर टीका केली होती. त्याचा समाचार त्यांनी घेतला.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत सध्या अपक्ष आणि छोट्या पक्षांना महत्त्व आलं आहे. त्यामुळेच मंगळवारपासून बुहजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना भेटण्यासाठी विविध पक्षाचे उमेदवार आणि नेतेमंडळी विरारला येत आहेत. आज विधानपरिषदेचे राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांनीही ठाकूरांची भेट घेतली. आणि त्यांच्याबरोबर दुपारचं जेवणं केले. यावेळी पञकारांशी बोलताना निंबाळकर यांनी ठाकूराची विचारपूस करण्यासाठी आल्याच सांगितलं.
विधानपरिषदेत मतदानासाठी एक एक मत महत्त्वाचं असताना, नालासोपाराचे आमदार आणि हितेंद्र ठाकूरांचे पुञ क्षितिज ठाकूर हे 11 जूनला न्यूयाँर्कला गेल्याचं ठाकूरांनी मान्य केलं आहे. कुटुंबातील एका व्यक्तीचं वैद्यकीय उपचार सुरु असल्यामुळे क्षितिज ठाकूर गेल्याचं सांगितलं. आमची कुटुंबाप्रती ही जबाबदारी आहे. आणि ती आम्हाला निभवावी लागणार असल्याचं सांगून, क्षितिज मतदानाला येण्याची आशा धुसर असल्याच ही सांगितलं.
हितेंद्र ठाकूरांनी यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. क्षितिज ठाकूर मतदानाला येणार नसल्याचं सांगत, प्रत्येक निवडणुकात असायला हवं हे बरोबर असलं तरी त्याचबरोबर कुटुंबाला वेळ दिलाच पाहिजे. असं म्हणत संजय राऊत वर ही निशाणा साधला आहे. शेवटी येथे काय मतदान केल्यावर काही चार हुशार लोक आम्हाला घोडाबाजार बद्दल चर्चा करायला लावतात. त्यामुळे नाही मतदान केलं तर चालेलं, असं म्हणाले. कोणताही आधार नसताना, लोक बोलतात, घोडाबाजाराबद्दल बोलतात, माकड चेष्टा चालतात त्यांना आवर बसेल, असे ठाकूर म्हणाले.