एक्स्प्लोर
काँग्रेसचा अर्ज बाद करायचा, महादेव जानकरांचा व्हिडीओ व्हायरल
नागपूर : राज्याचे दुग्धविकासमंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये महादेव जानकर प्रशाकीय अधिकाऱ्याला विरोधकांचे अर्ज बाद करण्याचा सल्ला देत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगरपालिकेसाठी येत्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. याठिकाणी आपण पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला कपबशी हेच चिन्ह द्या, अशी मागणी महादेव जानकर यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे केली आहे.
तसंच धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसचा अर्ज आल्यास तो बाद करा, असंही जानकर बोलल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतं आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान मी फक्त विनंती केली, आचारसंहिता भंग केली नाही, असं म्हणत महादेव जानकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement