Heavy Rain : पूर्व विदर्भात कोसळधार! सात जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, अनेक गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत
Vidarbha Rain Update : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना आजही मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. तर या पावसाचा सर्वाधिक फटका हा पूर्व विदर्भात बसल्याचे बघायला मिळाले आहे.
Vidarbha Rain Update : गेल्या दोन दिवसापासून उपराजधानी नागपूरसह (Nagpur News) पूर्व विदर्भात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने (Heavy Rain) सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे. अतिवृष्टी सदृश्य पावसामुळं (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आजही विदर्भातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. तर या पावसाचा सर्वाधिक जोर हा पूर्व विदर्भात बघायला मिळाला असून मुसळधार पावसाचा फटका स्थानिक नागरिकांसह शेतकऱ्यांना देखील बसला आहे.
चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील एक गावतलाव फुटल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. तर गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गडचिरोली (Gadchirol) जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अनेक गावांचा थेट संपर्क तुटला असून वाहतूक व्यवस्थाही कोलमाडल्याचे चित्र आहे. एकुणात पूर्व विदर्भात पावसाने हाहाकार केल्याचे चित्र आहे.
100 हुन अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे
अशीच काहीशी परिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात देखील बघायला मिळाली आहे. जिल्ह्यात पाऊसाच जोर काही भागात कमी झाला असला तरी पार्लकोटा नदीला कालपासून पूर आला आहे. त्यामुळे जिल्हा मुख्यालयाशी भामरागड तालुक्यातील 100हुन अधिक गावांचा कालपासून थेट संपर्क तुटला आहे. तर भामरागड जलमय झालं आहे. सद्याची स्थिती बघितलं तर भामरागड शहरातील मुख्य बाजारपेठापर्यत पुराचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे 50हुन अधिक दुकाने, घरे पाण्याखाली आले आहेत. जिल्ह्यातील पाऊसाची एकंदरीत स्थिती बघितलं तर काही भागात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. तर काही भागात रिमझिम पाऊस पडतो आहे.
मात्र जिल्ह्यातील बंद झालेले रस्त्यांची स्थिती बांघितल तर 4 मुख्य महामार्ग बंद झाले आहेत, तर 26 छोटे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. छत्तीसगढ राज्यात पडत असलेला जोरदार पाऊस आणि गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्या प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज असून जिल्ह्यात सगळीकडे आपत्ती व्यवस्थापनची टीम नजर ठेवून आहे.
गोसीखुर्द धरण बनला सेल्फी पॉइंट! वाहत्या पाण्यात तरुणांची जीवघेणी हुल्लडबाजी
अशातच, गोंदिया जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोंदिया जिल्ह्यातील नदी-नाल्यासह धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळं भंडारा जिल्ह्यात सर्वत्र जलमयस्थिती निर्माण झालेली आहे. अशात जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद आहेत. तर, गोसीखुर्द धरणावर पर्यटकांनाही बंदी करण्यात आलेली आहे. अशावेळी नागरिकांनी पाण्यात उतरू नये आणि सेल्फीसाठी हुल्लडबाजी करू नये, असं जिल्हा प्रशासनानं आवाहन केलेलं असतानाही आता काही तरुणांचे व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये काही तरुण भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाच्या अगदी काठावर उभं राहून सेल्फी घेण्यासाठी हुल्लडबाजी करीत असल्याचं दिसून येत आहे. काही तर पाणी वाहत असल्यानं बंद केलेल्या मार्गावरून दुचाकीनं प्रवास करीत असल्याचं दिसून येत आहे. याही पलीकडं जाऊन काहींनी तर, हिरोपंती करताना अगदी मार्गावरून पाणी वाहत असलेल्या ठिकाणी दुचाकी थांबवून सेल्फी घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अशांवर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
महत्वाच्या बातम्या: