Vicky Kaushal : शिवराय आणि संभाजी महाराजांची पावलं आग्र्याला लागली हे भाग्य; आग्र्याच्या किल्ल्यात विकी कौशल भावुक
Shivjayanti At Agra Fort : छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही तर तो विचार आहे. ती फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे असं विकी कौशल म्हणाला.

नवी दिल्ली: छावा या चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका करण्याची संधी मिळाली ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे असं अभिनेता विकी कौशल म्हणाला. याच आग्र्याच्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची पाऊले पडली ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानास्पद आहे असंही तो म्हणाला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आग्र्याच्या किल्ल्यामध्ये साजरी करण्यात आली. त्यानिमित्त कार्यक्रमात विकी कौशल बोलत होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
विकी कौशल म्हणाला की, "छत्रपती संभाजी महाराजांमध्ये असलेले धाडस आणि वीरतेचं बीज हे कदाचित आग्र्याच्या किल्ल्यात रोवलं गेलं असावं. कारण ते नऊ वर्षांचे असताना, आग्र्याच्या किल्ल्यामध्ये बंदी असताना, त्यांनी शिवाजी महाराजांचे शौर्य आणि बुद्धीचातुर्य पाहिलं असावं. या ठिकाणी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराचांची पायधूळ लागली. त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर मी भावुक होतोय."
देवेंद्र फडणवीसांचे आभार विकी कौशल यांने त्यांचे आभार मानले. त्यांना महाराष्ट्राचा लाडका देवाभाऊ असे म्हणतात असं म्हणत विकी कौशलने देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केलं.
शिवाजी महाराज हा एक विचार
विकी कौशल म्हणाला की, "छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक नाव नाही तर तो विचार आहे. ती फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. शिवाजी महाराज केवळ एक राजा किंवा योद्धा नव्हते. ते एक खरे जाणते राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमी पुढे असायचे आणि त्यांची मावळे आणि प्रजा मागे होती. शिवाजी महाराजांनी शत्रूचा पहिला घाव स्वतःवर घेतला आणि प्रजेचं रक्षण केलं."
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. कारण आजच्या दिवशी मी सकाळी रायगडवर गेलो आणि महाराजांचा आशीर्वाद घेतला. रायगडवर गेल्यानंतर मला एक प्रकारचा वेगळा आनंद मिळाला. तर आता आग्र्यामध्ये येण्याची संधी मिळाली असं विकी कौशल म्हणाला.
शिवाजी महाराजांचे शौर्य, त्यांचे धाडस आणि विचारधारा ही येणाऱ्या पिढ्यांच्या हृदयात अखंडपणे राहण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहनही विकी कौशलने केले.
ही बातमी वाचा:
























