एक्स्प्लोर
Advertisement
वेळास समुद्र किनारी कासवांची जत्रा!
रत्नागिरी : 2018 सालात बऱ्याच सुट्ट्या या शनिवार-रविवारला लागून आल्या आहेत. हे लाँग विकेंड सेलिब्रेट करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी कासव महोत्सव हा चांगला ऑप्शन आहे. ज्यांना समुद्रकिनारी निवांत फिरायला, हिंडायला आवडतं. अशांसाठी कासव महोत्सव एक पर्वणीच आहे.
वेळास कासव महोत्सव :
मागील अनेक वर्षांपासून कासव महोत्सव आयोजित केला जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास समुद्र किनारी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. वेळास मुंबईपासून 220 किमी दूर आहे. या काळात अनेक कासव अंड्यातून बाहेर पडतात आणि समुद्राच्या दिशेने चालू लागतात. ही दृश्य मन मोहून टाकणारी असतात. हीच दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक आता वेळास किनारी हजेरी लावतात. हा महोत्सव 16 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत असणार आहे.
कासव महोत्सवाचा नेमका हेतू काय?
ओलिव रिडले या प्रजातीचे कासव काही वर्षांपूर्वी कमी झाले होते. त्यामुळे या प्रजातीच्या कासवांमध्ये वाढ व्हावी यासाठी काही वर्षांपूर्वी वेळास गावातील नागरिकांनी सह्याद्री निसर्ग मित्र आणि कासव मित्र मंडळ यांच्या साथीने एक मोहीम सुरु केली. वेळास समुद्र किनारी अनेक मादी कासव आपली अंडी देत असत. पण सुरुवातीला ही अंडी काही जण चोरुन नेत. अखेर ही गोष्ट ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हा कासवांच्या अंड्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली. जेव्हा कासव अंड्यातून बाहेर पडून समुद्राच्या दिशेने जाण्यासाठी सक्षम होतात त्याच वेळी या कासव महोत्सवाचं आयोजन केलं जातं. यावेळी कासवांना समुद्रात सोडण्याची संपूर्ण प्रकिया पर्यटकांना पाहायला मिळते.
अतिशय निसर्गरम्य ठिकाण :
कासव महोत्सवाशिवाय इथे अनेक पर्यटन स्थळं आहे. या संपूर्ण भागात सुंदर समद्र किनारे, किल्ले, हरिहरेश्वर मंदिरही आहे. कासव महोत्सवाआधी पर्यटक येथील समुद्र किनाऱ्यांना आवर्जून भेट देण्यासाठी यायचे.
कासव महोत्सवला जाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा :
- इथं आपण कासवांच्या पिल्लांचे फोटो अगदी निवांतपणे काढू शकतात.
- वेळास किनारी कासवांची पिल्लं पाहण्याचा काळ जानेवारी ते एप्रिल असतो.
- कासवांची पिल्लं सकाळी 7 ते 7:30 आणि संध्याकाळी 6 ते 6:30 समुद्रात सोडले जातात.
- कासवं समुद्रात सोडताना पर्यटकांसाठी बॅरिकेड्स लावले जातात. त्यामुळे हे बॅरिकेड्स पार करण्याचा प्रयत्न करु नका. उत्साहाचा भरात आपण हे बॅरिकेड्स पार केल्यास कासवांच्या पिल्लांना इजा होऊ शकते आणि त्यांचा मृत्यूही होऊ शकतो.
- वेळास समुद्र किनारा हा अतिशय धोकादायक असा मानला जातो. इथं दरवर्षी अनेकांचा बुडून मृत्यूही झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी अजिबात पोहायला जाऊ नका.
- वेळास हे एक छोटं गाव आहे. त्यामुळे इथं तुम्हाला फार उत्कृष्ट सुविधा मिळणार नाही. पण जर तुम्हाला निसर्गाचा पुरेपूर आनंद लुटायचा असेल तर वेळासला नक्की भेट द्या!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रीडा
भविष्य
Advertisement