Vegetable Rate Hike : टोमॅटो आणि कांद्यानंतर आता वांगंही महागलं, प्रतिकिलो 100 रुपयावर
Vegetable Rate Hike : वातावरणातल्या बदलानं शेतात भाज्यांचं मोठं नुकसान झालंय. त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झालाय.
हिंगोली : टोमॅटो आणि कांद्यानंतर आता वांग्यानंही भाव खाल्ला आहे. शाकाहारी चिकन मानल्या जाणाऱ्या वांग्याला आता चिकनचाच भाव येऊ लागलाय आणि हिंगोलीत वांग्याचा दर तब्बल 100 रुपये किलोवर पोहोचलाय. हिंगोलीत किरकोळ बाजारात वांगी चक्क 100 रुपये किलो दरानं विकली गेली. तर टोमॅटोची 80 रुपये किलो दरानं विक्री होतेय. वातावरणातल्या बदलानं शेतात भाज्यांचं मोठं नुकसान झालंय. त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झालाय. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, टोमॅटो, कांदा या शंभरीपार चर्चेतल्या यादीत आता वांग्यानंही स्थान मिळवलंय.
वातावरणाच्या बदलामुळे शेतीमधील पालेभाज्या त्याचबरोबर फळभाज्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचा परिणाम थेट बाजारपेठेत पडला आहे. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या या भाजीपाल्याच्या किमती वाढल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. तर अन्य भाजीपाल्याचा विचार करण्यास नको त्यामुळे आता भाजीपाला खरेदी करताना सर्वसामान्य नागरिकांना स्वतःच्या खिशाची काळजी करूनच खरेदी करावा लागत आहे.
टोमॅटोचा विचार केला तर किरकोळ बाजारपेठेत टोमॅटोचे भाव 60 ते 80 रुपये किलोवर जाऊन पोहोचले आहेत मात्र एकीकडे ही परिस्थिती असतांना दुसरीकडे काबाडकष्ट करून टोमॅटोचे पिक घेणाऱ्या बळीराजाच्या हातात काहीच मिळत नसल्याने तो हवालदिल झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे अवकाळी पावसानंतर टोमॅटो पिकाला फळमाशीचा मोठा फटका बसत असल्याने टोमॅटो खराब होत असून व्यापारी माल विकत घेईल का? आणि घेतला तरी योग्य भाव मिळेल का? असे अनेक प्रश्न सध्या टोमॅटो उत्पादकांसमोर उभे राहिले आहेत.
संबंधित बातम्या :
- Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला सांगितला भाजपला हरवण्याच उपाय, जाणून घ्या काय म्हणाले रणनीतीकार?
- भाजपला हरवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येतील, शशी थरुर यांना विश्वास
- धक्कादायक! दोन वर्षे ना सुनावणी ना जामीन..., महिलेने तुरुंगातच दिला मुलाला जन्म