आमदार होणार, पैसा येणार! एकमुखी रुद्राक्षाच्या नावाखाली वसईत राजकीय नेत्याची 12 लाखांची फसवणूक
Vasai Latest News : आमदार होणार, पैसा भरभरुन येईल असं अमिष दाखवून तीन भामटयांनी वसई पंचायत समितीच्या माजी सभापतीला तब्बल 12 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघड झालं आहे.
Vasai Latest News : एकमुखी रुद्राक्षाची माळ परिधान केल्याने राजकीय व आर्थिक प्रगती होईल. आमदार होणार, पैसा भरभरुन येईल असं अमिष दाखवून तीन भामटयांनी वसई पंचायत समितीच्या माजी सभापतीला तब्बल 12 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघड झालं आहे. याबाबत वसई पोलीस ठाण्यात संगनमतातून फसवणूक केली असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यात दोन आरोपीला अटक केले असून एक मुख्य आरोपी फरार आहे.
प्रत्येक राजकीय व्यक्तीला एकदा तरी आमदार, खासदार व्हावं असे वाटते. आणि तीच संधी साधून काही भामटे फसवणूक देखील करतात. वसईत देखील पंचायत समितीची माजी सभापती नरेंद्र कृष्णा पाटील यांना एक मुखी रुद्राक्षाची माळ घातल्याने तुम्ही आमदार होणार, पैसा भरभरुन येईल असे अमिष दाखवले. तीन जणांना तब्बल 12 लाख रुपयांची फसवणूक केली. आरोपी चकाकचक सुरेशसिंग भोसले आणि जोरानाथ शंभुनाथ नाथ आणि यांचा आणखी एक मुख्य आरोपी आहे.
तीन जणांनी नरेंद्र पाटील यांना अनेक मोठ्या नेत्यांनी एकमुखी रुद्राक्षाची माळपरिधान केल्याने त्यांची राजकीय आणि आर्थिक प्रगती झाली आहे. तीच एकमुखी रुद्राक्ष आम्ही तुम्हाला देतो. तो एकमुखी रुद्राक्ष तुम्ही परिधान करा. तुमची राजकीय, आर्थिक प्रगती होणार, तुम्ही आमदार होणारं असं आमिष दाखवले. तीन जणांनी 2020 मध्ये पाटील यांची फसवणूक केली आहे. त्यानंतर यांच्यातील एक आरोपी नरेंद्र पाटील यांच्या वारंवार संपर्कात राहून, त्यांना भूलथापा देत 12 लाख रुपयांची रक्कम देखील उकळली. जेव्हा आपली फसवणूक झाल्याची समजल्यावर 25 जानेवारी रोजी पाटील यांनी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी मोठ्या शिताफीने यातील दोन आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरु आहे. वसई न्यायालयाने दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली आहे. मात्र फरार मुख्य आरोपी पकडल्या नंतर यातील मोठे खुलासे होणार असून, किती राजकीय, व्यापारी, सामाजिक क्षेत्रातील लोकांना फसविले ते समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.