(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वंचित बहुजन आघाडी लवकरच इंडिया आघाडीत लवकरच सहभागी होणार, शरद पवार समावेशाबाबत अनुकूल
आगामी इंडिया आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या सहभागाबाबत घटक पक्षांशी चर्चा होण्याची शक्यता आहे. नुकतेच प्रकाश आंबेडकरांकडून राहुल गांधींना संविधान महासभेचं निमंत्रण देण्यात आले आहे.
मुंबई: वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) लवकरच इंडिया आघाडीत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काही महिन्यापूर्वी शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये (Prakash Ambedkar) बैठक झाली. या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत (I.N.D.I.A. Alliance) घेण्याबाबत शरद पवार अनुकूल असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडीला लवकरच इंडियामध्ये सहभागी करण्यात येणार आहे. इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांचा समावेश केला जाईल अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी शरद पवार- प्रकाश आंबेडकर यांची बैठक झाली. या बैठकीत पवार आणि आंबेडकरांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून इंडिया आघाडीत घेण्याबाबत शरद पवार अनुकूलता दर्शवली. त्यानंतर इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकरांना घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सहभागाबाबत घटक पक्षांशी चर्चा होण्याची शक्यता आहे. नुकतेच प्रकाश आंबेडकरांकडून राहुल गांधींना संविधान महासभेचं निमंत्रण देण्यात आले आहे.
मुंबईत झालेल्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण नव्हते
विशेष म्हणजे विरोधकांची आघाडी असलेल्या 'इंडिया'ची बैठक मुंबईत झाली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण नव्हते. वंचित बहुजन आघाडीला काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी करून घेत नसल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. इंडिया आघाडीत वंचितला सहभागी करून घेण्यासंदर्भात कुठली भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस घेत नसल्याचे किंवा कळवत नसल्याचं वंचित बहुजन आघाडी कडून सांगण्यात आले होते.
इंडिया आघाडीत सहभागी होण्याबद्दल काँग्रेस अध्यक्षांना पत्र
1 सप्टेंबर रोजी वंचितनं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी पत्र लिहिलं होतं तसेच ईमेल देखील केला होता. पत्रात आम्ही आम्हाला इंडिया आघाडीत सहभागी व्हायचं आहे, असे म्हटले होते. तसेच ज्या अटी असतील त्यासोबतच आम्ही बोलणी करण्यास तयार आहे .
वंचित बहुजन आघाडी 48 जागांवर निवडणूक लढणार
वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) संपूर्ण 48 जागांवर निवडणूक लढणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय प्रकाश आंबेडकर यांनी अकोला मतदारसंघातून आपली उमेदवारी घोषित केली आहे
हे ही वाचा :