एक्स्प्लोर

तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला! सत्ता आल्यास मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री, राजरत्न आंबेडकर यांची माहिती

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर (Rajratna Ambedkar) यांनी केली आहे.

Election 2024 Hingoli:आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. एकीकडे राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री पदावरुन दावे-प्रतिदावे आणि पक्षांतर्गत वाद रंगत असताना तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर (Rajratna Ambedkar) यांनी केली आहे. राजरत्न आंबेडकर  यांनी तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून मराठा आंदोलक  मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात तिसऱ्या आघाडीला कितपत यश मिळतं आणि हा प्रस्ताव मनोज जरांगे पाटील स्वीकारतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला!

महाविकास आघाडी आणि महायुतीनंतर राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी होऊ पाहत आहे.  या आघाडी बाबत बोलताना राजरत्न आंबेडकर यांनी आमच्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मनोज जरांगे असतील अशी माहिती दिली आहे. ते आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर होते. तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. 

तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनीही आज मोठे वक्तव्य करत मोठा खळबळजनक दावा केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर एकमेकांचे कट्टर वैरी झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरु असून या दोघांची एक गुप्त भेट झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.  सिद्धार्थ मोकळे यांच्या या दाव्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का, अशा चर्चांना आता उधाण आले आहे.

फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यावर काय म्हणाले आंबेडकर?

दरम्यान, सिद्धार्थ मोकळे यांच्या या दाव्यायानंतर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरु असून या दोघांची एक गुप्त भेट झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला. याबाबत विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, त्यांच्या कडची माहिती त्यांनी पब्लिक केली. मागच्या निवडणुकीत संविधान आणि आरक्षणवाद्यांना फसविण्यात आले आहे. पुन्हा फसविण्यात येऊ नये, असे त्यांनी म्हटले असल्याचे ते म्हणाले. 

हे ही वाचा 

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget