एक्स्प्लोर

Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीची नामुष्की सुरुच; आता पुन्हा एकदा बदली उमेदवार जाहीर करण्याची आली वेळ

Vanchit Bahujan Aghadi : लोकसभेचे दोन टप्पे पार होऊन तिसऱ्या टप्प्याचे मतदान राज्यांमध्ये आले, तरी उमेदवारी बदलाचा सिलसिला सुरूच ठेवण्याची नामुष्की  वंचित बहुजन आघाडीवर आली आहे.

Vanchit Bahujan Aghadi : उमेदवार बदलीचा सिलसिला वंचित बहुजन आघाडीमध्ये सुरूच आहे. लोकसभेचे दोन टप्पे पार होऊन तिसऱ्या टप्प्याचे मतदान राज्यांमध्ये आले, तरी उमेदवारी बदलाचा सिलसिला सुरूच ठेवण्याची नामुष्की  वंचित बहुजन आघाडीवर आली आहे. त्यामुळे दिलेली उमेदवारी रद्द करणे किंवा उमेदवारी बदलण्याचा वंचित बहुजन आघाडीचा खेळ सुरूच आहे. आता वंचित बहुजन आघाडीला उत्तर मुंबईमध्ये जाहीर केलेली उमेदवारी सुद्धा बदलावी लागली आहे. 

उत्तर मुंबईमधून उत्तर भारतीय चेहरा देण्याचा प्रयत्न फसला

उत्तर मुंबईमधून उत्तर भारतीय चेहरा देण्याचा प्रयत्न वंचितकडून होता. याठिकाणी बिना सिंह यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, उमेदवाराने माघार घेतल्याने उमेदवारी बदलाची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली आहे. आता नव्याने सोनल गोंदाणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास 39 मतदारसंघात उमेदवारांची घोषणा वंचितकडून करण्यात आली आहे तर चार ठिकाणी पाठिंबा देण्यात आला आहे. मात्र, उमेदवारांनी घेतलेली माघार आणि बदललेल्या उमेदवारांची संख्या जवळपास दुहेरी आकड्यात गेली आहे. कोल्हापुरातून शाहू महाराजांना तर नागपुरात विकास ठाकरेंना पाठिंबा देण्यात आला. बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्यात आला आहे. 

अनेक जागांवर उमेदवारांचा खेळखंडोबा 

यापूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवार बदलण्यात आला आहे. संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात आधी भाजपच्या मुंबई उत्तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष संजीव कलकोरी हे उमेदवार होते. त्यांच्याऐवजी आता परमेश्वर रणशूर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. मुंबई ईशान्यमधून दौलत कादर खान यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आली आहे. 

अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांनी अर्ज दाखल केला. मात्र, वंचितकडून प्राजक्ता पिल्लेवान यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे ऐनवेळी फॉर्म न भरता वंचितकडून आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देण्याची घोषणा केली. रामटेकमधून शंकर चहांदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, किशोर गजभिये यांना ऐनवेळी पाठिंबा दिल्याने वंचितनं आपला उमेदवार माघार घेतला होता. यवतमाळमधून तब्येतीच्या कारणामुळे सुभाष खेमसिंग पवार यांनी माघार घेतल्यानंतर अभिजित राठोड यांनी वंचितकडून अर्ज दाखल केला. मात्र, अर्जच बाद झाल्याने अपक्ष अनिल राठोड यांना उमेदवारी देण्यात आली.

इतर महत्वाच्या बातम्या 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget