(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vaibhav Naik On Nitesh Rane: चोराच्या उलट्या बोंबा! नितेश राणेंच्या आरोपांवर वैभव नाईकांची प्रतिक्रिया
Vaibhav Naik On Nitesh Rane: सभागृहात बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांवर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलंय.
Vaibhav Naik On Nitesh Rane: सभागृहात बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांवर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलंय. शिवसैनिक संतोष परब यांच्या हत्तेचा कट ज्यांनी केला, त्यांनीच आता माझ्या हत्येचा कट केला म्हणून आरोप करायचा, हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा अशा शब्दात वैभव नाईकांनी नितेश राणेंवर टीकेचा बाण सोडलाय. दरम्यान, कोल्हापुरातील रुग्णालयात ऍडमिट असताना मला ठार करण्याचा कट होता, असा आरोप नितेश राणेंनी केला होता.
सभागृहात नितेश राणे काय म्हणाले?
सभागृहात बोलताना नितेश राणे म्हणाले होते की, "मी कोल्हापुरातील रुग्णालयात अॅडमिट असताना अचानक डॉक्टरांनी मला सीटी एन्जिओ टेस्ट करण्याची गरज असल्याचं सांगितलं. पण एका कर्मचाऱ्यानं मला सांगितलं की साहेब, हे सीटी एन्जिओ करु नका. त्या निमित्तानं इंक शरिरात टाकली जाईल आणि त्यामधून तुम्हाला ठार करण्याचा कट आहे. या कर्मचाऱ्यानं मला आधीच सांगितलं म्हणून मी जिवंत राहिलो.
वैभव नाईकांची प्रतिक्रिया
नितेश राणे यांनी संतोष परब यांच्या हत्येच्या कटात नितेश राणे सहभागी होते. त्यांनीच आता असं आरोप करणं हास्यास्पद आहे. संतोष परब हल्याप्रकरणी अटक केल्यानंतर तब्येत ठीक असताना देखील त्यांच्या मागणीनुसार त्यांना जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नितेश राणेंनी आपल्या हत्येचा कट रचला म्हणणं म्हणजे पोलिसांवर आणि जिल्ह्या रुग्णालयातील व्यवस्थेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. या दबावाला सरकारने भीक घालू नये. नितेश राणेंवर त्यांच्यावरील आरोप धाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वैभव नाईकांनी केलाय.
"या राज्यात गुन्हे वाढत आहेत. पण राज्य सरकारकडून त्या संबंधी खोटी माहिती दिली जात आहे. फार मोठ्या मोठ्या गोष्टीत या लोकांना लक्ष घालायचे आहे, यांना फार मोठी काम करायची आहेत. विरोधी पक्षातील लोकांवर गुन्हे दाखल करायचे आहेत. पालिकेला तर काहीच काम राहिले नाही. पालिकेच्या आयुक्ताला फक्त आता लोकांच्या घराची मेजरमेन्टची काम रहिले आहे. यांना विचारले तर हे म्हणतात की वरुन आदेश आले. नेमके वरून आदेश येतात तरी कुठून?" असाही प्रश्न नितेश राणेंनी सभागृहात उपस्थित केला होता.
हे देखील वाचा-
- Vinayak Raut vs Brahman Sangh : विनायक राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर ब्राह्मण समाजाची नाराजी, मागितली जाहीर माफी, म्हणाले...
- Jalna: धक्कादायक! नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळेकरी मुलांचा बुडून मृत्यू, जालना येथील घटना
- T. Harish Rao : शेतीसाठी 24 तास वीज असल्यानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तेलंगणात शेती खरेदी, तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांचा दावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha