Vinayak Raut vs Brahman Sangh : विनायक राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर ब्राह्मण समाजाची नाराजी, मागितली जाहीर माफी, म्हणाले...
विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी समस्त ब्राह्मण समाजाचा (Brahman Sangh) व हिंदू धर्माचा घोर अपमान केल्याचा आरोप ब्राह्मण समाज समन्वय समितीने केला होता.
Vinayak Raut vs Brahman Sangh : औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत ( Vinayak Raut ) यांनी काल ब्राह्मण समाजावर भाष्य केले होते. ज्यामध्ये ब्राह्मण समाज व हिंदुत्वाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यातील ब्राह्मण संघटना आक्रमक झाल्या होत्या. विनायक राऊतांनी बिनशर्त माफी मागावी अन्यथा त्यांचा दशक्रिया विधी करण्यात येईल, असा इशारा ब्राह्मण सेवा संघाने दिला होता. यानंतर विनायक राऊत यांनी ब्राम्हण समाजाची जाहीर माफी मागितली. काय म्हणाले राऊत?
काही चूक झाली असेल तर माफ करा - राऊत
औरंगाबाद खासदार विनायक राऊत ब्राह्मण समाजाच्या भेटीला पोहचले. “शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही” असे वक्तव्य विनायक राऊत यांनी केल्याने ब्राह्मण समाज समन्वय समितीने त्यावर आक्षेप घेतला होता. आज ब्राह्मण समाजाच्या सदस्यांची भेट घेताना आनंद झाला. काही कळत नकळत माझ्या तोंडून उद्गार निघाले त्यात कोणाचाही अनादर करणे हा उद्देश नव्हता. मी आज नतमस्तक आणि माफी मागायला आलो. ब्राह्मण समाजाची माफी मागून त्यांना कृपा आशीर्वाद कायम ठेवा असे म्हटले आहे. काही चूक झाली असेल तर माफ करा असंही म्हटलं.
"शिवसेनेकडून असा उल्लेख करण्याची ही पहिली वेळ नाही"
विनायक राऊत यांनी समस्त ब्राह्मण समाजाचा व हिंदू धर्माचा घोर अपमान केल्याचा आरोप ब्राह्मण समाज समन्वय समितीने केला होता. शिवसेना पक्षातर्फे व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांतर्फे असा उल्लेख करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील महाराष्ट्राच्या विधानसभेत जाहीर सभेत तसेच पत्रकार परिषदेमध्ये अनेकदा हे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांतर्फे करण्यात आले आहे, असे ब्राह्मण समाज समन्वय समितीने म्हटले होते.ब्राह्मण सेवा संघाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी एका भाषणात 'आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही', असे वादग्रस्त विधान केले. त्यामुळे अखिल ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. सत्तेसाठी हापापलेल्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीनंतर आपले हिंदुत्व इतर पक्षाच्या दावनीला बांधून हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांचा विश्वासघात केला आहे. अशा शिवसेनेच्या खासदाराने आम्हा ब्राम्हणांना हिंदुत्व काय असते, हे शिकवू नये.
ब्राह्मण समाजाच्या भावना नक्की मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार
ब्राह्मण समाजाच्या भावना नक्की मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असे राऊत यावेळी म्हणाले, तेलंगणात महाराष्ट्रातील शेतकरी शेती विकत घेतात. हे महाराष्ट्र सरकारचे अपयश नाही, आज महाराष्ट्रामध्ये मोठी वीज थकबाकी आहे. तरी देखील काही सवलती देत आहेत. काही येतील का मुख्यमंत्र्यांना भेटून याबाबत सांगू. लोकांमध्ये फिरत असताना शेतकऱ्यांकडून लोकांकडून याबाबतच्या अडचणी आम्हाला सांगितल्या जातात. त्या मुख्यमंत्र्याकडे पोचविण्यात येतील असे विनायक राऊत म्हणाले,.
औरंगाबाद खंडपीठातची नाराजी आणि शिफारस पत्र बद्दल काय म्हणाले राऊत?
आम्ही लोकप्रतिनिधी कडून दररोज अनेक जण शिफारस मागायला येतात. कोणाला शिफारस करणे म्हणजे आदेश देणार नाही. ही सगळी प्रक्रिया न्यायालयासमोर त्यावेळेस सिद्ध होईलच. आम्ही कुठलीही अवैध कारवाई केलेली नाही. योग्य कालखंडानंतर भूखंड दिला आहे आणि योग्य वेळेला सत्य बाहेर येईल. असे विनायक राऊत म्हणाले,