एक्स्प्लोर
Advertisement
Majha Impact : घरात अठराविश्व दारिद्र्य असलेल्या मोलकरणीची मुलगी डॉक्टर होणार
परभणी शहरातील कपिल नगर झोपडपट्टीत विटा रचून पत्रे टाकलेल्या या घरात गंगासागर वाघमारे त्यांच्या आई आणि 3 मुली उर्मिला,दीपाली आणि वैष्णवी राहतात. शहरातील अनेक घरात घरकाम करुन गंगासागर आपला उदरनिर्वाह चालवतात.
परभणी : घरकाम करुन आपल्या लेकीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेल्या संघर्षाला परभणीच्या उर्मिला वाघमारे या सावित्रीच्या लेकीनेही सार्थकी ठरवून नीट परीक्षेत 535 गुण मिळवले. याच मायलेकींच्या संघर्षांची कहाणी एबीपी माझाने दाखवल्यानंतर याची दखल परभणीच्या डॉ. हुलसुरे सोशल फाउंडेशनने घेतली असून आता फाउंडेशनने तिचे पुढचे पूर्ण शिक्षण होईपर्यंत उर्मिलाला दत्तक घेतले आहे.
परभणीतील डॉ सोशल हुलसुरे फाऊंडेशनच्या माजी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ प्रवीण शिनगारे यांच्या हस्ते उर्मिला आणि तिच्या आईचा शाल आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आलं. शिवाय मेडिकलच्या पुढच्या पाच वर्षासाठी लागणारा सर्व खर्च फाऊंडेशन उचलणार असून त्याच खर्चासाठी तिला चेकहि देण्यात आला.
VIDEO | टॉप 25 सुपरफास्ट | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | एबीपी माझा
परभणी शहरातील कपिल नगर झोपडपट्टीत विटा रचून पत्रे टाकलेल्या या घरात गंगासागर वाघमारे त्यांच्या आई आणि 3 मुली उर्मिला,दीपाली आणि वैष्णवी राहतात. शहरातील अनेक घरात घरकाम करुन गंगासागर आपला उदरनिर्वाह चालवतात. परिस्थिती बिकट असली तरीही गंगासागर यांच्या तिन्ही लेकी अत्यंत हुशार आहेत. उर्मिला सगळ्यात मोठी असून शहरातील शिवाजी महाविद्यालयांत शिक्षण घेत यंदा तिला 12 विच्या परीक्षेच 84 टक्के गुण मिळाले. पाठोपाठ उर्मिलाने वैद्यकीय प्रवेश परीक्षा दिली ज्यात तब्बल 535 गुण घेऊन तिने आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पुर्ण केले.
दरम्यान उर्मिलाची गुणवत्ता हि अफाट आहे. तिच्यात जिद्द हि आहे मात्र आज शिक्षण पूर्ण करण्यासाठी केवळ या बाबी पुर्ण नाहीत. त्यामुळे समाजाने अशा संघर्षातून यश शोधणाऱ्या गुणवंत मुलींच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे बनले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement