एक्स्प्लोर

शिंदेवाडीतील शेतकऱ्याचा मुलगा झाला साहेब, झेडपीत शिकलेल्या शुभम जाधवचं UPSCत घवघवीत यश

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत (UPSC Recult) माळशिरस (Malshiras) तालुक्यातील शिंदेवाडी गावातील पांडुरंग जाधव या शेतकऱ्याचा मुलगा शुभम (shubham Jadhav) याने देशात 445 वे स्थान मिळवले आहे.  

पंढरपूर : काल लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत (UPSC Recult) माळशिरस (Malshiras) तालुक्यातील शिंदेवाडी गावातील पांडुरंग जाधव या शेतकऱ्याचा मुलगा शुभम (shubham Shinde) याने देशात 445 वे स्थान मिळवले आहे.  प्राथमिक शिक्षण शिंदेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केल्यावर त्याने माध्यमिक शिक्षण माळीनगर येथे पूर्ण केले. यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मधून बी ए इकॉनॉमिक्स मधून पदवी घेतल्यावर ज्ञान प्रबोधिनी आणि युनिक क्लासेस मधून केंद्रीय लोकशाही आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. 

अधिकारी होण्याची जिद्द मनात ठेवत अभ्यास सुरू केला. सलग चार वेळा मुलाखतीपर्यंत जाऊनही शुभम याची निवड झाली नाही. यावेळी मात्र त्याने देशात 445 स्थान पटकावत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. शुभम हा इतर मागास प्रवर्ग मधून येत असल्याने यावेळी त्याला IPS मिळण्याची शक्यता आहे. तरीही पुढच्या वर्षी अजून जोमाने तयारी करून आयएएस होण्याची शुभम याची जिद्द आहे. 

बिहारचा शुभम कुमार देशात पहिला 

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल शुक्रवारी जाहीर झाला. बिहारच्या शुभम कुमारने देशात पहिला येण्याचा मान मिळवला. या परीक्षेत महाराष्ट्रानेही आपली यशस्वी कामगिरी कायम ठेवली असून एकूण 761 उमेदवारांपैकी राज्यातील 100 हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून मृणाली जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर विनायक नरवाडे हा दूसऱ्या क्रमांकावर आहे. यूपीएससीतील गुणवत्ता यादीत या दोघांनी अनुक्रमे 36 आणि 37 वा क्रमांक पटकावला आहे.
             
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या 2020 सालच्या परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालात  पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे.  यामध्ये मृणाली जोशी (36), विनायक कारभारी नरवाडे (37), रजत रविंद्र उभयकर(49), जयंत नाहाटा (56), विनायक महामुनी (95) यांचा समावेश आहे. 

राज्यातील इतर यशस्वी विद्यार्थी
लक्ष्य कुमार चौधरी (132), शुभम कुमार खंडेलवाल (133), रीचा कुलकर्णी (134), कमलकीशोर देशभुष खंडारकर (137), अवध सोमनाथ निवृत्त (166), अभ‍िषेक खंडेलवाल (167), गौरव रविंद्र सांळुके, पार्थ कश्यप (174), प्रतिक अशोक धुमाळ (183), आशिष गंगवार(188), रीना प्रधान (194), नितीशा संजय जगताप (199), संचित गंगवार (222), तुषार उत्तम देसाई (224), प्रथमेश अरविंद राजेशिर्के (237), साहील खरे (243), संकेत बलवंत वाघे (266), मयुर खंडेलवाल (284) प्रवीण दराडे  (312) , आकाश चौधरी (322), आनंद पाटील (325), सचिन चौबे (334), श्रीकांत विसपुते (335), साहिल संगवान (336), दिव्या गुंडे (338), सुहास गाडे (350), सागर मिसाळ (353), सुरज गुंजाळ (554), अनिल म्हस्के (361), अर्पिता ठुबे (383), सागर वाडी (385), आदित्य जिवने (399), अमोल मुरकुट (402) गोगणा गावित (422), अनिकेत फडतरे (426), श्रीराज वाणी (430), राकेश आकोलकर (432), वैभव बांगर (442), शुभम जाधव (445), अमर राऊत (449), शुभम नागरगोजे (453), ओंकार पवार (455),  अभिषेक दुधाळ (469), प्रणव ठाकरे (476),  श्रीकांत मोडक (499), यशवंत मुंडे (502), अनुजा मुसळे (511), बानकेश पवार (516), अनिकेत कुलकर्णी (517), अश्विन राठोड (520), अर्जित महाजन (521), शुभम स्वामी (523), श्रीकांत कुलकर्णी (525), शरण कांबळे (542), स्नेहल ढोके (564), सचिन लांडे (566), स्वप्निल चौधरी (572), अभिषेक गोस्वामी (574), अनिल कोटे (584), विकास पालवे (587), विशाल सारस्वत (592), मोहम्मद शाहिद खान (597) हर्षल घोगरे (614), अजिंक्य विद्यागर (617), निलेश गायकवाड (629), हेताळ पगारे (630), रविराज वडक (633), कुणाल श्रोते (640), सायली गायकवाड (641), सुलेखा जगरवार (646)  ,सुबोध मानकर (648)  ,शिवहार मोरे (649)   ,सुब्रह्मण्य केळकर (653) , सुमितकुमार धोत्रे (660), किरण चव्हाण (680), सुदर्शन सोनवणे (691), विनीत बनसोड (692), श्लोक वाईकर (699), अजय डोके (705), देवव्रत मेश्राम (713), स्वप्निल निसर्गन (714), शुभम भैसारे (727), पियुष मडके (732), शितल भगत (743), स्वरूप दीक्षित (749). 

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी 2020 मध्ये परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या प्रार्दूभावामुळे मुलाखती घेण्यास यावर्षी उशीरा झाला. लेखी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यावर्षीच्या फेब्रुवारी ते जुलै या महिन्यात मुलाखत घेण्यात आली. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 761 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून 263,आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 86, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून(ओबीसी) 229, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) 122, अनुसूचित जमाती प्रवर्गातून 61 उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 25 शारीरिकरित्या दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 150 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये  सामान्य गट 75, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 14,  इतर मागास वर्ग 55, अनुसूचित जाती 05, अनुसूचित जमाती  01  उमेदवारांचा समावेश आहे.  

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू 
भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 72, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  18 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –49, अनुसूचित जाती (एस.सी.) – २8, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 13 जागा रिक्त आहेत. गुणाणूक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – 36 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 15, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 03,  इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 10, अनुसूचित जाती (एस.सी.) – 05, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 03 जागा रिक्त आहेत. 

भारतीय पोलीस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण – 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 80,  उमेदवार आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 20,  इतर मागास प्रवर्गातून - 55, अनुसूचित जाती प्रवर्गातून - 30, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 15  उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. 

केंद्रीय सेवा गट अ - या सेवेमध्ये एकूण - 302 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - 118 उमेदवार, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  34, इतर मागास प्रवर्गातून - 84, अनुसूचित जाती प्रवर्गातून - 43 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –23 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

केंद्रीय सेवा गट ब - या सेवेमध्ये एकूण – 118  जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) -53, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 11  उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून - 31, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 16  तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 07 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल. 
 
151 उमेदवारांची निवड तात्पुरती  आहे.
अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नांवे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Speech Funny : राज ठाकरे यांचा डायलॉग...पत्नी, लेक आणि श्रीकांत खळखळून हसले!ABP Majha Headlines : 10 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray : मनसेचे 6 नगरसेवक खोके देऊन फोडले, उद्धव ठाकरेंवर पहिला वार... ABP MajhaRaj Thackeray On Sushma Andhare : लावरे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी लावला सुषमा अंधारेंचा व्हिडिओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
Embed widget