Nishikant More: अप्पर पोलीस आयुक्त निशिकांत मोरे यांना जामीन मंजूर
Nishikant More: अप्पर पोलीस आयुक्त निशिकांत मोरे (Nishikant More) यांच्यावर असलेली अटकेची टांगती तलवार दूर झाली आहे.
Nishikant More: अप्पर पोलीस आयुक्त निशिकांत मोरे (Nishikant More) यांच्यावर असलेली अटकेची टांगती तलवार दूर झाली असून त्यांना पनवेल कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. ज्यामुळं निशिकांत मोरे यांना उच्च न्यायालयाकडून तात्पपूर्ता दिलासा मिळाला आहे. निशिकांत मोरे यांच्याविरोधात 2020 मध्ये विनयभंग आणि अपहरण प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. या बाबत पनवेल न्यायालयाने त्यांच्यावर तात्काळ अटकेची कारवाई करण्यात यावी, असा आदेश नवी मुंबई पोलिसांना दिले होते. या संपूर्ण प्रकरणी आता पुढील सुनावणी 15 दिवसांनी होणार आहे.
6 जानेवारी 2020 ला पीडित युवतीने व्हाट्सअप वर पालकांना एक संदेश पाठवला होता. ज्यात ती आत्महत्या करीत आहे अशा आशयाचा मजकूर होता. मात्र, आठ दिवसांनी सदर युवतीस पोलिसांनी शोधून काढले असता ती तिच्या मित्रा बरोबर मूळ गावात नातेवाइकाकडे गेली होती. त्यानंतर निशिकांत मोरे यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता. त्यामुळे हा वाद न्यायालयात पोहचला होता. हे प्रकरण पनवेल न्यायालयात सुरू असल्याने गेल्या आठवड्यात निशिकांत मोरे यांच्या विरोधात अटक वॅारंट काढण्यात आलं होतं. यावर निशिकांत मोरे यांच्या वकिलांनी पनवेल सेशन कोर्टात धाव घेत बाजू मांडली असता कोर्टानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
काय आहे प्रकरण?
दरम्यान, 6 नोव्हेंबर 2020 मध्ये संबधित तरुणी आणि तिच्या वडिलांनी निशिकांत मोरेच्या विरोधात तळोजा पोलीस स्थानकात पॉक्सो कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल केला होता. ही तक्रार घटनेच्या 6 महिन्यानंतर दाखल करण्यात आली. 5 जून 2019 ला वाढदिवशी मोरे यांनी त्या तरुणीच्या चेहऱ्यावर केक लावल्यानंतर चुकीची हरकत केली. दोन्ही परिवारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संपत्तीचा वाद सुरु असल्याचं देखील बोललं जातं आहे.
हे देखील वाचा-
- ना निवृत्तीचा, ना वाढत्या वयाचा फरक, धोनीची कमाई 30 टक्केंनी वाढली, 38 कोटींचा भरला कर
- TATA IPL: आयपीएल 2022 मध्ये 'या' अनकॅप्ड खेळाडूंची चमकदार कामगिरी, भारतीय संघात स्थान मिळणार?
- RCB Vs KKR, IPL 2022: उमेश यादवची अप्रतिम कामगिरी, पावर प्लेमध्ये दोन विकेट्स घेऊन खास यादीत प्रवेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha