शहरी नक्षलवाद प्रकरण, सेलिब्रिटी हमीदार मिळूनही गौतम नवलखांची सुटका लांबली
Urban Naxal Case Update : सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिल्यानंतरही शहरी नक्षलवादप्रकरणी अटकेत झालेल्या गौतम नवलखा यांची अद्याप कारागृहातून सुटका झालेली नाही.
Urban Naxal Case Update : सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिल्यानंतरही शहरी नक्षलवादप्रकरणी अटकेत झालेल्या गौतम नवलखा यांची अद्याप कारागृहातून सुटका झालेली नाही. जेष्ठ मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी त्यांच्या नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्याची मागणी कोर्टाकडे केली होती, जी मान्य करण्यात आली आहे. त्यासाठी हमीदार म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळे या बुधवारी विशेष न्यायालयात उपस्थित राहिल्या होत्या. मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना नवलखा यांची हमीदार म्हणून मान्यताही दिली. परंतु, सुरक्षेचं कारण पुढे करत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) बुधवारी नवलखांच्या राहत्या घरावर काही प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे हमीदाराला मान्यता मिळूनही नवलखा यांची कारागृहातील सुटका लांबणीवर पडली आहे.
नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्याची नवलखा यांची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यांची ही मागणी 10 नोव्हेंबर रोजी मान्य करताना नवलखा यांना महिन्याभरासाठी नजरकैदेत ठेवण्याचे आणि याबाबतच्या आदेशांची 48 तासांत अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यासाठी हमीदार प्रमाणपत्राची गरज नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. त्यानंतरही बुधवारी विशेष न्यायालयात न्यायाधीश राजेश कटारिया यांच्यासमोर ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळे या नवलखा यांच्या हमीदार म्हणून उपस्थित झाल्या. त्यामुळे नवलखा यांची कारागृहातून सुटका होऊन त्यांना घरात नजरकैदेत पाठवण्याची अपेक्षा होती. मात्र, एनआयएनं आता नवी मुंबईतील त्या जागेच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.े आणि न्यायालयानेही त्याची दखल घेतल्याने नवलखा यांची कारागृहातील सुटका लांबणीवर पडली आहे.
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन जेष्ठ लेखक आणि पीपल्स युनियन फॉर डेमोक्रॅटिक राइट्सचे माजी सचिव, गौतम नवलखांसह इतर काही जणांविरोधात पुणे पोलीसांनी देशविघातक कायवायांवर सहभागी असल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला. त्यांनतर नवलखांना 28 ऑगस्ट 2018 रोजी अटक करण्यात आली होती.
मोबाईल वापरावर बंदी
नजरकैदेत असताना नवलाखा यांना इंटरनेट, मोबाईल फोन, लॅपटॉप, आयपॅड किंवा इतर कोणतेही संपर्क साधन वापरण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली आहे. आरोपी नवलाखा यांना दिवसातून एकदाच 10 मिनिटांसाठी सुरक्षा रक्षकांनी दिलेला फोन वापरण्यास परवानगी असणार आहे. त्याशिवाय, त्यांच्या जोडीदार साहबा हुसैन यांनादेखील इंटरनेट कनेक्टिव्हीटी नसणार मोबाईल फोन वापरण्याची सूचना केली आहे. कोर्टाने आपल्या आदेशात सांगितले की, नवलाखा यांच्या जोडीदाराचा फोन तपासणे, कॉल रेकॉर्ड करण्यास एनआयएला परवानगी असणार आहे. नजरकैदेत असताना कॉल रेकॉर्ड किंवा एसएमएस डिलीट करू नये अशीही सूचना देण्यात आली होती.
इतर महत्वाच्या बातम्या वाचा :
Kolhapur District Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणूक खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न केलेले उमेदवार निवडणूक लढवण्यास अपात्र