एक्स्प्लोर
चंद्रपुरात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी !

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच आज अवकाळी पावसाने हजरे लावली. तास-दीड तास अवकाळी पावसानं चंद्रपुरात तळ ठोकल्यानं चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. कधी रिमझिम तर कधी जोरदार स्वरूपात बरसलेल्या या पावसाचा चंद्रपूरकरांनी मनमुराद आनंद लुटला. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहराच्या तापमानात वाढ व्हायला लागली होती. चंद्रपूर शहराचं तापमान ३३ ते ३५ अंशावर पोहचलं होत. यामुळं चंद्रपूरकरांनी स्टोर रूममध्ये ठेवलेल्या कुलरच्या साफसफाई व दुरुस्तीच्या कामाला सुरवात केली होती. त्यातच सोमवारपासून चंद्रपूर शहरातील वातावरणात एकाकी बदल झाल्यानं एक दोन दिवसात अवकाळी पाऊस होण्याची चिन्हे दिसू लागली होती. हवामान खात्यानेही सर्वत्र सोमवारी अवकाळी पावसाचे संकेत दिले होते.
दरम्यान, मंगळवार दिवस उजडल्यापासून ढगाळी वातावरण कायम होतं. यासोबतच सकाळपासून थंड वारा देखील सुरु होता. त्यामुळं अवकाळी होण्याचे संकेत असतानाच दुपारनंतर एकाकी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने बरसायला सुरुवात केली. उन्हाळी मोसमात पडलेल्या पावसाचा अनेकांनी आनंद लुटला, तर काहींनी झाडांचा आडोसा घेतला. तास-दीड तास रिमझिम बरसलेल्या पावसानं नंतर मात्र उसंती घेतली.
दरम्यान, मंगळवार दिवस उजडल्यापासून ढगाळी वातावरण कायम होतं. यासोबतच सकाळपासून थंड वारा देखील सुरु होता. त्यामुळं अवकाळी होण्याचे संकेत असतानाच दुपारनंतर एकाकी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने बरसायला सुरुवात केली. उन्हाळी मोसमात पडलेल्या पावसाचा अनेकांनी आनंद लुटला, तर काहींनी झाडांचा आडोसा घेतला. तास-दीड तास रिमझिम बरसलेल्या पावसानं नंतर मात्र उसंती घेतली. Before You Go
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















