एक्स्प्लोर
Advertisement
मिलिंद एकबोटेंना तुरुंगात भेटणारी ‘ती‘ व्यक्ती कोण?
"येरवडा कारागृह उपनिरीक्षक स्वाती साठे यांनी 24 आणि 25 मार्चच्या दरम्यान स्वत: एकबोटेंच्या नातेवाईक किंवा मित्राला सोबत नेऊन त्यांची भेट घडवून दिली."
पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी तुरुंगात असलेल्या मिलिंद एकबोटे यांच्यावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. येरवडा कारागृहात मिलिंद एकबोटे यांना एक व्यक्ती भेटून गेल्याचा आरोप केला गेला आहे. विशेष म्हणजे, हा आरोप दुसरा-तिसरा कुणी केला नसून, ठाणे कारागृहाचे निलंबित अधिक्षक हिरालाल जाधव यांनी केला आहे.
“येरवडा कारागृह उपनिरीक्षक स्वाती साठे यांनी 24 आणि 25 मार्चच्या दरम्यान स्वत: एकबोटेंच्या नातेवाईक किंवा मित्राला सोबत नेऊन त्यांची भेट घडवून दिली. यात साठेंनी आपल्या पद आणि अधिकाराचा दुरुपयोग केला.”, असा आरोप हिरालाल जाधव यांनी पत्राद्वारे केला आहे.
तसेच, येरवाडा कारागृह उपनिरीक्षक स्वाती साठे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही जाधव यांनी केली आहे.
हिरालाल जाधव यांनी पत्रात ‘त्या’ व्यक्तीचे नाव मात्र सांगितले नाही.
हिरालाल जाधव यांनी हे पत्र तुरुंग विभागाचे पोलिस महासंचालक, गृह विभागाचे प्रधान सचिव यांना पाठवलेच आहे. मात्र त्याचसोबत, त्यांनी हे पत्र देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनाही धाडले आहे.
हिरालाल जाधव हे गेल्या 19 महिन्यांपासून विनयभंगाच्या आरोपावरुन निलंबित आहेत.
दरम्यान, ठाणे कारागृहाच्या निलंबित अधिक्षकाने असा आरोप केल्याने यामागील गांभिर्य वाढले आहे. शिवाय, मिलिंद एकबोटेंना भेटणारी ती व्यक्ती कोण, या चर्चेलाही उधाण आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement