एक्स्प्लोर
Advertisement
भारनियमनाने त्रस्त सलून व्यावसायिकाचा अनोखा फंडा
भारनियमनामुळे मनोज यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला होता. मात्र, त्या गोष्टीचा बाऊ न करता त्यांनी अनोखी शक्कल लढविली.
सटाणा : राज्यात सध्या विजेच्या तुटवड्यामुळे भारनियमन सक्तीचं झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह अनेक व्यावसायिकांना देखील त्याचा मोठा फटका बसत आहे. मात्र, या भारनियमानावर नाशिक जिल्हयातील एका सलून व्यावसायिकाने एक नामी उपाय शोधला आहे.
नाशिक जिल्हयातील ग्रामीण भागात अनेक तास सध्या भारनियमन सुरु आहे. नाशिकमधील सटाणामध्येही अनेक तास भारनियमन सुरु आहे. त्यामुळे तेथील छोट्या व्यावसायिकांना बराच फटका बसत आहे.
मात्र, परिस्थितीसमोर हतबल होण्यापेक्षा त्यावर मात करणाऱ्यांची नेहमीच चर्चा होते. अशीच चर्चा सध्या सटाणामधील सलून व्यावसायिक मनोज पगारेंची सुरु आहे.
भारनियमनामुळे मनोज यांच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला होता. मात्र, त्या गोष्टीचा बाऊ न करता त्यांनी अनोखी शक्कल लढविली. संध्याकाळनंतर वीज गायब असली तरी व्यवसाय सुरु राहावा आणि ग्राहकांना सेवा देता यावी यासाठी त्यांनी चक्क आपल्या डोक्यावर उपरणे गुंडाळून त्यात बॅटरी लावली. त्यामुळे ग्राहकांची दाढी-कटींग करताना त्यांना पुरेसा उजेड मिळतो. त्यामुळे आता काहीशा प्रमाणात त्यांचा व्यवसाय सुरळीत सुरु आहे.
मात्र, असं असलं तरी राज्यातील भारनियमन लवकरात लवकर बंद व्हावं अशीच सर्वांची इच्छा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement