एक्स्प्लोर

Nitin Gadkari : ....तर भारतातील निर्यातही दुप्पट अन् गरिबीही होईल दूर; नितीन गडकरींनी सांगितली युक्ती

एलएनजी सारख्या जैव इंधनाच्या माध्यमातून भारताने वाहतुकीचा खर्च 9 टक्क्यांपर्यंत कमी केलं, तर भारताची निर्यात दुप्पट होऊन लाखो रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केलाय.

Nagpur News नागपूर :  एल एन जी म्हणजेच लिक्वीफाइड नॅचरल गॅस वर चालणाऱ्या ट्रकमध्ये डिझेलवर चालणाऱ्या ट्रकच्या तुलनेत इंधनाच्या खर्चात 50 टक्क्यांची बचत होते. त्यामुळे एलएनजी हे हे भविष्याचे इंधन असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले आहे. नागपुरात (Nagpur News) "बी एलएनजी" या कंपनीच्या गॅस पंपाचे उद्घाटन केल्यानंतर गडकरी बोलत होते.

चीन, अमेरिका आणि युरोपीय देशांच्या तुलनेत भारतात वाहतुकीचा खर्च खूप जास्त म्हणजेच 16 टक्के एवढा प्रचंड आहे. तर चीनमध्ये तेच दर 8 टक्के असून अमेरिकेत 12 टक्के एवढे आहे. एलएनजी सारख्या जैव इंधनाच्या माध्यमातून भारताने वाहतुकीचा खर्च 9 टक्क्यांपर्यंत कमी केलं, तर भारताची निर्यात दुप्पट होऊन लाखो रोजगार निर्मिती होईल, भारताची गरिबी दूर होईल असेही गडकरी म्हणाले.

भारताची निर्यात दुप्पट होऊन लाखो रोजगार निर्मिती होईल- नितीन गडकरी

एलएनजी हे डिझेल आणि पेट्रोलच्या तुलनेत फक्त स्वस्तच नाही, तर जास्त सुरक्षित इंधन ही आहे. शिवाय पर्यावरणाच्या दृष्टीने एलएनजी उत्तम इंधन असल्याचे मत बी एलएनजी चे व्यवस्थापकीय संचालक प्रणव शर्मा यांनी व्यक्त केले आहे. सध्या वाहतूकदारांना त्यांच्या ट्रक्समधून डिझेल चोरीची समस्येला सामोरे जावे लागत आहे. मात्र, एलएनजी एक गॅस असल्याने त्याची चोरी होऊ शकत नाही, असे ही ते म्हणाले. औषध निर्मितीच्या क्षेत्रात अग्रगण्य कंपनी मानल्या जाणाऱ्या "बैद्यनाथ"नं आता जैव इंधनाच्या क्षेत्रातही व्यवसाय सुरू केलं असून "बी एलएनजी" या कंपनीच्या माध्यमातून बैद्यनाथ समूह विदर्भात एल एन जी गॅस पंपांची स्थापना करत आहे. त्याच मालिकेत नागपूर - उमरेड महामार्गावर आज नितीन गडकरी यांच्या हस्ते एलएनजी पंपाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते.

इंधन उत्पादनामध्ये बायो फ्युलच्या माध्यमातून आपला महत्वाचा वाटा- नितीन गडकरी

देशाचा शेतकरी एक दिवस इंधन उत्पादन करेल, विमानांना उडवण्यासाठी लागणारे एअर फ्युल तयार करेल, असं मी गेल्या पंधरा वर्षापासून बोलत होतो. शेती क्षेत्रात माझ्यासोबत काम करणारे माझे सहकारी ही साहेब काहीही बोलतात, असे बोलायचे. माझ्या पाठीमागे माझ्या वक्तव्याची खिल्ली उडवायचे, माझ्यासमोर बोलण्याची त्यांची हिंमत नव्हती, मात्र आज मला आनंद आहे की आपल्या देशातील शेतकरी इंधन उत्पादनामध्ये बायो फ्युलच्या माध्यमातून आपला वाटा देत आहेत. 

देशात इथेनॉल वर आधारित पेट्रोल पंप सुरू होत आहे. देशातील सर्व मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांना मी इथेनॉल चालणारे वाहन उत्पादन करण्यास लावले आहे. शेतकरी खाद्य पिकांच्या उत्पादन करून श्रीमंत होऊ शकत नाही. तर शेतकऱ्यांनी बायोफ्यूल तयार करणाऱ्या पिकांच्या माध्यमातून इंधन उत्पादनात वाटा द्यावा, त्याच्यातून ते श्रीमंत होऊ शकतात. असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच नागपुरात नैसर्गिक शेती या पुस्तकाचे विमोचनाच्या कार्यक्रमात  बोलताना व्यक्त केला होता. त्यानंतर आज पुन्हा नितीन नितीन गडकरींनी ही युक्ती सांगितली आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
आमिर खानसोबत दिला होता ब्लॉकबस्टर चित्रपट, एका चुकीने उद्धवस्त झालं अभिनेत्रीचे करिअर
आमिर खानसोबत दिला होता ब्लॉकबस्टर चित्रपट, एका चुकीने उद्धवस्त झालं अभिनेत्रीचे करिअर
Pune Ganpati Visarjan: 24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarajan 2024 : पुढच्या वर्षी लवकर या.. लालबागच्या राजाला अखेरचा निरोपLalbaugcha Raja Visarjan : राजाची शान भारी, राजाचा थाट भारी! राजाचं विसर्जन, भक्तांचे डोळे पाणावलेLalbaugcha Raja Visarjan :खोल समुद्र..., तब्बल 50 बोटींची सुरक्षा, विसर्जनाचे Exclusive ड्रोन दृश्यंBuldhana Jalgaon Jamod : जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीत तणाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
आमिर खानसोबत दिला होता ब्लॉकबस्टर चित्रपट, एका चुकीने उद्धवस्त झालं अभिनेत्रीचे करिअर
आमिर खानसोबत दिला होता ब्लॉकबस्टर चित्रपट, एका चुकीने उद्धवस्त झालं अभिनेत्रीचे करिअर
Pune Ganpati Visarjan: 24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Lalbaugcha Raja Visarjan 2024: अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
Ganesh Visarjan : अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या कामाने मंगलप्रभात लोढा इम्प्रेस, म्हणाले, मी त्यांना आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार
अमृता फडणवीसांना मी आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार; मंगलप्रभात लोढांची तोंडभरुन स्तुती
Indias Exports : भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
Embed widget