एक्स्प्लोर
Advertisement
गांधी विचारांच्या परीक्षेत अरुण गवळी पहिला, 80 पैकी गुण मिळाले...
हजारो कैद्यांमधून 160 कैद्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामध्ये अरुण गवळी पहिला आला.
नागपूर: अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखल्या जणाऱ्या अरुण गवळीने चक्क गांधी विचारांच्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे. मुंबईच्या दगडी चाळीवर एकेकाळी साम्राज्य करणारा हा गुन्हेगार आज नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये आहे. आयुष्याचा पेपर चुकवलेल्या अरुण गवळीला एकूण 80 मार्कच्या गांधी विचारांच्या पेपरमध्ये 74 मार्क मिळाले आहेत.
हजारो कैद्यांमधून 160 कैद्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामध्ये अरुण गवळी पहिला आला.
शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी हा नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. इथे दरवर्षी सहयोग ट्रस्ट, सर्वोदय आश्रम आणि मुंबई सर्वोदय मंडळ असे तिघे मिळून गांधी विचारांची परीक्षा घेत असतात.
परीक्षा ऐच्छिक असते आणि जेलमध्ये एक महिना आधी गांधींच्या जीवनावरची काही पुस्तके दिली जातात. अरुण गवळीने या परीक्षेसाठी नाव दिलं नव्हतं. मध्येच कधीतरी अरुण गवळीला ही परीक्षा देण्याची इच्छा झाली. त्यानतंर त्याने ज्या अंडा सेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं आहे, तिथं पुस्तके मागवून घेतली. नंतर तो परीक्षेला बसला. इतरही वेळीही तो जेलच्या लायब्ररीमधून पुस्तके मागवत असल्याचे समजते.
कशे असतो गांधी विचारांचा पेपर
१. गांधीजी सर्वात पहिले शाळेत कधी गेले?
२. अंधारात जाताना गांधीजी रॅम हा शब्द का म्हणायचे?
३. गांधीजींनी धोतर आणि पंचा का परिधान केला?
असे 80 बहुपर्यायी प्रश्नअसतात आणि त्यासाठी 80 गुण असतात. मात्र हा पुस्तकात बघून लिहायचा पेपर असतो. सर्वांचेच म्हणणे हे आहे की एका तासात 80 प्रश्न सोडवायचे म्हणजे शेवटी पुस्तक पहिले वाचणे गरजेचे आहे.
जेलमध्ये अरुण गवळी हा अंडा सेलमध्ये आहे. ही सेल संपूर्णतः बंद असते आणि इथे कैद्याला एकट्याला ठेवण्यात येते. धोकादायक कैद्यांना अंडासेलमध्ये ठेवलं जातं. असे कैदी अन्य कैद्यांच्या संपर्कात आल्यास ते पुन्हा घातपात करु शकतात, त्यामुळे त्यांना अन्य कैद्यांपासून दूर ठेवलं जातं.
त्यामुळे या परीक्षेसाठी अरुण गवळीला परीक्षेच्या ठिकाणी म्हणजेच प्रार्थना सभागृहातही आणलं नाही. परीक्षेसाठी सर्व कैदी प्रार्थना सभागृहात होते, मात्र अरुण गवळी अंडासेलमध्येच होता. गवळीने सर्व प्रश्नांची उत्तरं दिली मात्र त्यातील 6 उत्तरं चुकली.
आपण पहिला आलो हे समजल्यानंतर अगदी शाळेतील मुलाला होतो तसा आनंद अरुण गवळीला झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement