Raj Thackrey: राज ठाकरेंचा पक्ष कामाचा नाही, विधानसभा निवडणुकीत महायुतीत कशाला घ्यायचं? मिटकरींवरील हल्ल्यानंतर अजितदादा गट आक्रमक
Raj Thackrey: राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. त्याचबरोबर आगामी निवडणुकीत सोबत घेण्यावरही त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Raj Thackrey: राष्ट्रवादी काँग्रेस नेते (अजित पवार गट) आणि आमदार अमोल मिटकरींच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.अमोल मिटकरींच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर त्यांनी ही मागणी केली.
मंगळवार (ता 30) जुलै रोजी अकोला येथील शासकीय विश्रामगृहाबाहेर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या गाडीचं मोठं नुकसान झालं. दरम्यान, या घटनेनंतर राज ठाकरेंवर (Raj Thackrey) फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केला आहे.
या घटनेवेळी एका मनसैनिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने राज ठाकरेंवर फौजदारी कारवाई करण्यात यावी असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackrey) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
अमोल मिटकरी यांच्यावरती अकोला विश्रामगृह येथे हल्ला करण्यात आला. लाठीकाठ्या आणून काही जण त्यांना मारायला आले होते. दरवाजा उघडला नाही म्हणून गाडी फोडली. या संपूर्ण प्रकरणात राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्यावर गुन्हे दाखल करावी मागणी केली होती. यामध्ये एका मनसैनिकाचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर सत्य समोर येईलच असंही उमेश पाटील (Umesh Patil) यांनी यावेळी म्हटलं आहे. तर राज ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल करा आमची मागणी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे असंही ते यावेळी म्हणालेत.
आगामी निवडणुकीत महायुतीत घेण्यावर मोठं वक्तव्य
पुढे बोलताना ते म्हणाले, राज ठाकरे (Raj Thackrey) रात्री पिचर बघतात, उशिरा उठतात काम काही करत नाही. पदाधिकाऱ्यांना भेटत नाहीत. ते कुत्र्यांसोबत खेळत बसतात. राज ठाकरेंच्या मनसेला कशाला महायुती सोबत घ्यायचं? ते काही कामाचे नाहीत. त्यांनी वेगळी निवडणूक लढवावी म्हणजे लोकांना समजेल त्याची ताकद किती आहे, अशा शब्दांमध्ये उमेश पाटलांनी (Umesh Patil) राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
फडणवीसांच्या राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया
उमेश पाटील (Umesh Patil) या देवेंद्र फडणवीसांच्या राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाची चर्चा हा त्यांच्या पक्षातील विषय आहे, मराठी माणूस मोठा होत असेल तर आनंदच आहे, असंही ते पुढे म्हणालेत.