एक्स्प्लोर
Advertisement
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीचं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना निमंत्रण, राज्यभरातून 400 शेतकरीही येणार
उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील (शिवाजी पार्क) शपथविधीसाठी महाराष्ट्रातील विविध भागातील 400 शेतकऱ्यांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे उद्या (28 नोव्हेंबर) मुंबईत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शिवसेना नेते विनायक राऊत यांच्याकडे शपथविधीच्या तयारीबाबत विचारणा केली. यावर राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 400 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच राज्यातील अनेक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनादेखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करुन आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करु इच्छितो, असे राऊत यांनी सांगितले.
शिवसेनेचे नेते आणि आमदार एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी शेतकऱ्यांसह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, आम्ही शपथविधीसाठी विविध राज्यांमधील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं आहे. तसेच द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनादेखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
शिवसेना नेते अनिल देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः सर्व मान्यवरांना निमंत्रणं पाठवत आहेत. आम्ही सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठवले आहे.
पाहा कसा असेल शपथविधी सोहळा?
अजित पवारांना कोणतं मंत्रीपद मिळणार? जयंत पाटलांना काय वाटतं?
अब की बार... ठाकरे सरकार! शपथविधी सोहळा कसा असणार? एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया | ABP MajhaVinayak Raut, Shiv Sena: Around 400 farmers from various districts of #Maharashtra have been invited for Uddhav Thackeray's swearing-in ceremony tomorrow. To give respect to the farmers, family member of those farmers who committed suicide have also been invited. (file pic) pic.twitter.com/JMPgfhTOmb
— ANI (@ANI) November 27, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement