Uddhav Thackeray: दानवे सोन्याचा चमचा घेऊन आले नाहीत, पण भरल्या ताटात प्रतारणा सुद्धा केली नाही; शिंदे बाजूला असतानाच उद्धव यांच्याकडून 'ठाकरी बाण'
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे बाजूला असल्याने उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना चांगलेच डिवचण्याचा प्रयत्न केला. भाजपला सुद्धा शालजोडे लगावले.

Uddhav Thackeray: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टर्म संपल्याने त्यांना आज (16 जुलै) निरोप देण्यात आला. यावेळी चांगलीच राजकीय टोलेबाजी रंगली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेत अंबादास दानवे यांना निरोप देताना भाषणांमध्ये चांगली टोलेबाजी रंगली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर येण्यासाठी कोणताही स्कोप नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांना मात्र सोबत येण्याची ऑफर दिली. यामुळे राजकीय भूवया उंचावल्या. उद्धव ठाकरे यांनी निरोपाच्या भाषणात भाजप आणि शिंदेंवर चांगलीच तोफ डागली. एकनाथ शिंदे बाजूला असल्याने उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना चांगलेच डिवचण्याचा प्रयत्न केला. भाजपला सुद्धा शालजोडे लगावले.
तुम्ही माझे आभार मानणार का?
उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की आंबादास दानवे त्यांची टर्म पूर्ण करत आहेत. निवृत्त होत आहेत असं म्हणणार नाही. यावेळी बोलताना फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन वक्तव्याचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी चिमटा काढला. ते म्हणाले की दानवे तुम्ही सुद्धा म्हटलं पाहिजे मी पुन्हा येईन. ठाकरे पुढे म्हणाले की काहीजण आज कौतुक करत असले तरी आंबादास यांना विरोधी पक्ष मिळते केल्यानंतर तेव्हा यांचे चेहरे कसे झाले माहित होते. ते पुढे म्हणाले की भाजपच्या तालमीत तयार झालेल्या अंबादास तुम्ही दिल्याबद्दल तुमचे आम्ही आभार मी मानतो. मात्र, तुम्ही माझे नेले त्यामुळे तुम्ही माझे आभार मानणार का? अशी विचारणा त्यांनी यावेळी केली.
अंबादास यांनी भरल्या ताटाशी कधीच प्रतारणा केली नाही
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नसल्याचं वक्तव्य केलं. याच वक्तव्याचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. ते म्हणाले की काही लोक म्हणाले की ते सोन्याचा चमचा घेऊन आले नाहीत. मात्र काही लोक असे आहेत जे भरलेल्या ताटातून उधळून गेले आहेत. पद मिळाले नाही म्हणून दुसऱ्याच्या रेस्टॉरंटमध्ये गेल्याचं म्हणत एक प्रकारे एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. अंबादास यांनी भरल्या ताटाशी कधीच प्रतारणा केली नाही. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मृणालताई गोरे यांच्या कार्याचा सुद्धा दाखला दिला. उद्धव ठाकरे म्हणाले की मृणालताई गोरे या कधीही पदासाठी डगमगल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांनी आबाचा दानवे यांचे जोरदार कौतुक केलं. माझ्याकडे कधीही कोणते पद न मागायला आलेला शिवसैनिक म्हणजे अंबादास दानवे असल्याचे ते म्हणाले. पावसाळा असल्याने कोणी कधी इकडे तिकडे उड्या मारू शकतो असं म्हणत त्यांनी शिवसेना शिंदे गटावरती जोरदार टीका केली.
इतर महत्वाच्या बातम्या























