एक्स्प्लोर

Uddhav Thackeray: शिंदेंवर आसूड, भाजपचा समाचार; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे

Uddhav Thackeray: पुढल्या वर्षी कर्नाटकची निवडणूक उद्या भाजप महाराष्ट्राचे तुकडे करतील. विठोबाला पण कर्नाटकात नेणार, अक्कलकोटचे स्वामी समर्थ तिकडे नेणार.

Uddhav Thackeray Speech: अनेक महिन्यांनंतर वर्षांनंतर आपल्या दर्शनाला आलो आहे. दसरा मेळाव्यानंतरच आई जिजाऊंच्या जन्मस्थानी आशीर्वाद घेऊन सुरुवात करायची, म्हणून बुलढाण्यात आलो. आज शहीद दिन, संविधान दिन. परंतु ते संविधान आज सुरक्षीत आहे का?  काही दिवस अगोदर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत होतो. आज देशाची लोकशाही वाचवायची ही सगळ्यांची भावना. तेच बोलले आमचे रेडे. आज नवस फेडायला गेले परवा हात दाखवायला गेले होते. तुमच भविष्य तुम्हाला माहिती नाही आणि हे राज्य चालवणार. दिल्लीने म्हटले की उठायचे बस म्हटले की बसायचे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. चिखली येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

काही जुने चेहरे दिसत नाहीत. नितिन देशमुख चांगला शिवसैनिक. ते परत आले.  आज सगळे काय झाडी काय डोंगर सगळे ओक्के. ते तिकडे आशीर्वाद घ्यायला गेले, मी जिजाऊंचे आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. काही गेलेत, नितिन आहे, विनायक राऊत आहेत, अरविंद सावंत आहेत. मी पुन्हा त्वेषाने उभा आहे.

कसे नेले इथल्या ताई मोठ्या हुशार थेट पंतप्रधानांना राखी बांधली फोटो छापून आणला. ही चालूगिरी लोक बघत नाहीएत. भाजप आज आयात पक्ष, भाकड पक्ष. यादी काढा मग समजेल किती आयात लोक. स्वतः चंद्रकांत पाटील बोलले. मनावर दगड ठेवला. आजही गद्दारांनी सांगावे आम्ही भाजपाच्या टिकिटावर लढणार नाही. बाळासाहेब हवेत, चिन्ह हवे मग तुमची मेहनत कुठे आहे?

छत्रपतींचा वारंवार अपमान करायचा. गुजरात निवडणुकीसाठी उद्योग तिकडे पाठवताहेत. काल कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातला गावांवर हक्क सांगताहेत. पुढल्या वर्षी कर्नाटकची निवडणूक उद्या भाजप महाराष्ट्राचे तुकडे करतील. मिंधे गप्प बसतील. विठोबाला पण कर्नाटकात नेणार, अक्कलकोटचे स्वामी समर्थ तिकडे नेणार. मी मुख्यमंत्री असतांना राज्यपालांचा आगाऊ पणा सहन केला नाही. काळ्या टोपीने अनेकदा अपमान केला. 

काल अमित शहा बोलले आम्ही धडा शिकवला. पण बाबरी पाडल्यावर शिवसेना उभी राहिली, अमरनाथ यात्रेवेळी शिवसेनाप्रमुख उभे राहिले. आमच दैवताचा पुराने आदर्श म्हणून उल्लेख करतात. सत्तारने सुप्रिया सुळेंचा अपमान केला. मी मुख्यमंत्री असतो तर लाथ घालून हाकलला असता. महाराष्ट्राचा अपमान होतोय, देवतांचा अपमान होतोय तुम्ही सहन करता हे असले बाळासाहेबांचे विचार नाहीत.

ज्योतिषाला हात दाखवता, आज शहीद दिवस हे नवस फेडायला. शेतकऱ्यासाठी वेळ नाही. पीकविमा मिळाला तुम्हाला. बुलढाण्यातला शेतकरी बांधवाचा उल्लेख. नागपूर अधिवेशनात मी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. माध्यमांसमोर विचारले शेतकऱ्यांना. खोके सरकार गादीवर आले आणि पनवती सुरु झाली. कसला नवस फेडता आणि शेतकरी दुर्लक्षित. अन्नदाता शेतकरी विचारतो खायच काय?  पंतप्रधान म्हणतात मी दोन तीन किलो शिव्या खातो. तुमच ठिक आहे शिव्या खाऊन जगता पण शेतकऱ्यांचे काय? मागे मोर्चा काढला वठणीवर आले विमावाले आता पुन्हा आणावे लागेल

डीपी जळते, बीड पॅटर्न मविआने आणला. फडणवीसांचे जुने विधान ऐकवले. देवेंद्र जनाची नाही मनाची लाज बाळगा. मी आव्हान देतो तुम्ही सत्तेत आहात ना वीजबिल माफ करा. वर वेगळी भाषा खालती उतरले की वेगळी भाषा. पश्चिम विदर्भाचा काही भाग राहिला हे मला माहिती आहे. अतिवृष्टीचे पैसे घोषित झाले किती लोकांना मिळाले चॅनलवाल्यांनी हे दाखवावे. खोटे बोलून रेटून न्यायचे.

शिवसेना जिवंत सळसळत रक्त. कितीही फोडा तुम्हाला शक्य होणार नाही. मी तुमच्या भरवशावर आहे पण तुमच्या संकटात उभे राहण्यासाठी आलो आहे. आत्महत्या करायची नाही. लंडनहून तलावार आणून होणार नाही ती पेलणार का?  ती ताकद शेतकरी मावळ्यात. एकीकडे छत्रपतींचा अपमान करायचा. 

संजय राऊत सारखा मर्द तुरूंगात जाऊन आले तरी सोबत. हे सगळे गद्दार, तोतये. यांचे कर्तृत्व शून्य. एका व्हिडिओत मुख्यमंत्री शेतीत रमले. शेतातला दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री. चिखल तुडवत जाणारे शेतकरी,  कधीतरी डीपी जळते. हा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जातो. तुम्ही ज्योतिष्याकडे जातो मग शेतकऱ्याने कुठे जायचे. तुमची सुबत्ता दाखवता मग शेतकरी उपाशी.

मी घरात बसूनही कामे केली त्याचे कौतुक कोरोना, शस्त्रक्रिया यामुळे बंधने. तुम्ही कुठे फिरता सुरत, गुवाहटी, गोवा. पोळ्याला बैलाला सजवलेल्या पन्नास खोके. तुम्ही घेतलेले पन्नास खोके शेतकऱ्यांना दिले तर त्यांचे भले होईल. ह्या मिंधे सरकार कडून काही अपेक्षा नाही. नविन युवकशक्ती येत होती त्यांच्या मध्ये असणारे निघून गेले. आपण हिंदुत्वावरुन कुणाला फसवले नाही. काश्मीर मध्ये भाजप मेहबूबा सोबत गेले तेव्हा काय होते? मी काँग्रेस राष्ट्रवादीला घेऊन धाराशिव आणि संभाजीनगर करुन दाखवले. आम्ही काही सोडलेले नाही बोक्यांना खोक्यांची भूक म्हणून हे गद्दारी करुन गेले. काय कमी केले होत तुमच? या गोरगरिबांनी तुम्हाला निवडून गेले. आज तात्पुरता सत्ता पण देशात तुमच्या कपाळावर गद्दाराची ओळख कायमची. 

निवडणुक हारणे जिंकणे सोडून द्या केवळ स्वार्थासाठी गेलात. मनगटात ताकत किती असते हे शेतकऱ्यांनी केंद्राला दाखवून दिले. त्यांना अतिरेकी म्हटल्या गेले. तुमच्या नांगराची ताकद प्रचंड. आपल चिन्ह, नाव गोठवल पण मशाली पेटवल्या मन पेटवलय. आधी विमा कंपनीला नम्र विनंती करा. वीज बिल मुक्त करा आम्ही कर्ज मुक्त केला.
शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर उतरेल हाथ वर करुन सांगा कितीही संकटे आली तरी आत्महत्या करणार नाही. पदाधिकाऱ्यांना सांगतोय शेतकऱ्यांच्या साठी रस्त्यावर उतरा. केवळ हमीभाव नाही हक्काचा भाव हवा. गद्दारांना धडा शिकवायचा, महाराष्ट्राचा अपमान, महाराजांचा अपमान सहन करायचा नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Suresh Dhas : प्राजक्ताताईंची प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, सुरेश धस यांनी भाजपमधून कुणाचा फोन आला ते सांगितलं, म्हणाले...
इतरांना वाटत असेल तू चुकलाय तर.... भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा सल्ला अन् सुरेश धस यांचा दिलगिरीचा निर्णय
मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो; प्राजक्ता माळींनी फडणवीसांची भेट घेताच सुरेश धसांचा यु-टर्न
मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो; प्राजक्ता माळींनी फडणवीसांची भेट घेताच सुरेश धसांचा यु-टर्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरीSantosh Deshmukh Wife Beed : मला वाटतं मीच कुणाला मारून येऊ, संतोष देशमुखांच्या पत्नीचा आक्रोषRamdas Athawale Full PC : मला वाटतं धनंजय मुंडेंचे थेट संबंध नाहीत, रामदास आठवले यांचं मोठं वक्तव्यSiddhesh Kadam on Mumbai Air Quality : मुंबईत प्रदूषण वाढलं, कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी कारवाई करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Suresh Dhas on Prajakta Mali : मला प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता,धस यांनी व्यक्त केली दिलगिरी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Beed Railway: बीडकरांसाठी गुडन्यूज, राजुरीपर्यंत धावली रेल्वे; 26 जानेवारीपर्यंत बीडमध्ये पोहोचणार आगीनगाडी
Suresh Dhas : प्राजक्ताताईंची प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, सुरेश धस यांनी भाजपमधून कुणाचा फोन आला ते सांगितलं, म्हणाले...
इतरांना वाटत असेल तू चुकलाय तर.... भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा सल्ला अन् सुरेश धस यांचा दिलगिरीचा निर्णय
मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो; प्राजक्ता माळींनी फडणवीसांची भेट घेताच सुरेश धसांचा यु-टर्न
मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो; प्राजक्ता माळींनी फडणवीसांची भेट घेताच सुरेश धसांचा यु-टर्न
सोशल मीडियावर फोटो व्हिडीओद्वारे दहशत माजवणं महागात पडणार, गुन्हे दाखल करणार, बीडच्या एसपींचा इशारा 
'...त्यांचे शस्त्र परवाने रद्द करणार' बीडचे SP नवनीत कॉवत यांची माहिती, दहशत माजवणाऱ्यांना इशारा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2024 | सोमवार
Pakistan vs Afghanistan War : तालिबानचा पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक! दोन्ही देशांची सीमारेषा असलेल्या ड्युरंड लाईनवर युद्धसदृश परिस्थिती
तालिबानचा पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक! दोन्ही देशांची सीमारेषा असलेल्या ड्युरंड लाईनवर युद्धसदृश परिस्थिती
Kirit Somaiya : मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
मालेगावमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना; किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा
Embed widget