एक्स्प्लोर

राज्यपाल दयावान माणूस, 48 तासांऐवजी सहा महिन्यांची मुदत दिली; उद्धव ठाकरेंचा टोला

येणाऱ्या काळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र बसू आणि मग कॉमन मिनिमम प्रोग्रामवर (Common Minimum Program) चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई  : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. राज्याचे राज्यपाल दयावान माणूस आहे म्हणून त्यांनी 48 तासांऐवजी सहा महिन्यांची मुदत आम्हाला दिली असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. भाजपची सत्तास्थापनेची मुदत संपण्यापूर्वी आम्हाला सत्तास्थापनेसाठी 24 तासांचा वेळ देण्यात आला. काल आम्ही राज्यपालांना भेटुन हीच विनंती केली होती की, आम्ही सत्तास्थापन करु इच्छीतो त्यासाठी आम्ही 48 तासाची मुदत मागितली होती. पण 48 तास नाही तर सहा महिने मुदत दिली असे राज्यपाल सर्व राज्यांना लाभावे असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र राज्याचं सरकार स्थापन करणे आणि ते स्थिरपणे चालवणे हा पोरखेळ नाही. त्याकरिता आम्हाला 48 तासांची मुदत पाहिजे होती, पण ती राज्यपालांनी दिली नाही. काल आम्ही प्रथम अधिकृतपणे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्यासंदर्भात संपर्क केला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र बसू आणि मग कॉमन मिनिमम प्रोग्रामवर (Common Minimum Program) चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपने आमच्यासोबत अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ठरवलं होतं. मात्र भाजपाने मला खोटं ठरवलं आणि ते माझ्यासाठी संतापजनक होतं. भाजपचा पर्याय मी संपवला नाही तो त्यांनी संपवला आहे. लोकसभेतच्या वेळी सुद्धा मी एकटा चाललो होते. त्यावेळेस असा माहोल होता कि त्यांची केंद्रात सत्ता येणार नाही. अशा अंधारात मी त्यांच्या बरोबर गेलो असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आघाडी सोबत जाण्यासाठी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्याचं मी ऐकलं आहे. एक चांगला मित्र म्हणुन त्यांचा सल्ला ऐकतो अशी कोपरखळी उद्धव ठाकरेंनी लगावली. मी भाजपा आणि मुफ्ती मेहमुबा एकत्र कसे आले, ती विचारधारा कशी एकत्र आली तो सुद्धा करार मागवलेला आहे. नितीश कुमार आणि भाजपा कसे एकत्र आले, रामविलास पासवान आणि भाजपा कसे एकत्र आले, मोदी हटाव म्हणणारे चंद्राबाबू आणि भाजपा कसे एकत्र आले होते.  या विचारधारा कोणत्या संगमावर एकत्र आल्या ही सगळी माहिती मी मागवली आहे. आणि ही माहिती एकत्र केल्यानंतर आम्ही भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र कसे येऊ हे आमचे आम्ही ठरवू असे उद्धव ठाकरें म्हणाले. तसेच हिंदुत्त्व ही आमची विचारधारा आहे. पण नुसत वचन द्याचं आणि ते पाळायचं नाही असं होणार नाही. हिंदुत्त्वाला वचनबद्धता हे महत्त्वाची आहे. देशात रामराज्य आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण रामराज्य आणावं ही आमची संकल्पना आहे. Uddhav Thackeray | लिलावतीमध्ये उद्धव ठाकरे-आशिष शेलार यांची भेट टळली, हर्षवर्धन पाटील-उद्धव यांची भेट | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget