एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : लोकशाही संपली हे मोदींनी लाल किल्ल्यावरुन सांगावं - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : धनुष्यबाणाचं तेज जनता मिंधे गट आणि भाजपला नक्कीच दाखवणार, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

Uddhav Thackeray : शिवसेना आणि धनुष्यबाण निसटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. लोकशाही संपली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन सांगावं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी दिली.  त्याशिवाय निवडणूक आयोगाच्या निर्णायाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेय. 

निवडणूक आयोगाचा हा निकाल लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवी वर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन 75 वर्षाचं स्वातंत्र्य संपलेलं आहे, असे जाहीर करावे.  लोकशाहीला आदरांजली वाहून बेबंदशाहीला सुरुवात झाल्याचं मोदींनी जाहीर करावे. 

न्यायव्यवस्था दबावाखाली कशी येईल, याची अनेक उदाहरणं पाहिली आहेत. आजचा हा निर्णय अत्यंत अनेपेक्षित आहे, कारण जवळपास सहा महिने सर्वोच्च न्यायालयत सुरु आहे. त्याची आता सलग सुनावणी सुरु होईल. तो निकाल लागेल तोपर्यंत निवडणूक आयोगानं निर्णय देऊ नये... 

कदाचित एक दोन महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागतील. त्यांना मुंबईला भिकेला लावून दिल्लीश्वरांच्या दारात उभे करायचं आहे. शिवसेना लेचीपेची नव्हती, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

सुप्रीम कोर्टात जाणार -

राजमान्यता मिळाली तरी चोर हा चोरच असतो, असा टोला लगावला. हिंमत असेल तर निवडणुका घ्या, शिवसेनाप्रमुखांच्या देव्हाऱ्यातील धनुष्यबाणाचं तेज जनता मिंधे गट आणि भाजपला नक्कीच दाखवणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात जाणार आहे.  नामर्द कितीही मातला तरी मर्द होऊ शकत नाही. राजमान्यता मिळाली तरी चोर हा चोरच असतो. चोराला चोरी पचणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. 

महाराष्ट्रातील जनता बदला घेतल्याशिवाय राहणार नाही

यंत्रणांचा वापर करून जेवढा आमच्यावर अन्याय कराल त्याचा बदला महाराष्ट्रातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. कोर्टातील निकालार्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देणं चुकीचं आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आले. लोकशाहीचं वस्त्रहरण होत असलेलं आम्ही खपवून घेणार नाही. अनेक घटना तज्ज्ञांनी सांगितलं आहे की 16 आमदार अपात्र ठरतील. परंतु, न्यायालयाच्या निकाला आधीच हा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.  

शिवसेना भवनावर दावा? काय म्हणाले ठाकरे 

एकनाथ शिंदे शिवसेना भवनावर दावा करणार? या प्रश्नावर ठाकरे म्हणाले ,शिवसेना भवनावर दावा सांगायला मोगलाई लागली का?  सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जसे निवडतात त्याच प्रक्रियेप्रमाणेच निवडणूक आयुक्तांची निवड व्हावी, असंही ठाकरे म्हणाले.  पक्ष कोणाचा बरोबर आहे, कोणाच्या बरोबर आहे, हे निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या जोरावर ठरवायला सुरू केलं तर कोणीही धनाढ्य माणूस आमदार-खासदार विकत घेऊन देशाचा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होऊ शकतो, असंही ठाकरे म्हणाले.

शेण खायचं होतं तर एवढा खटोटोप का? 

पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयुक्तांबद्दल बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी थोतांड केलं आहे. त्यांनी जेजे मागितलं ते त्यांना फॉरमॅटमध्ये आम्ही दिलं. परंतु आयुक्तांना जे करायचं ते त्यांनी केलंच. आज निवडणूक आयुक्तांनी जे शेण खाल्लं आहे ते खायचंच होतं तर एवढा खटोटोप का? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला.

दोन महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील 

"कदाचित एक दोन महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागतील. त्यांना मुंबईला भिकेला लावून दिल्लीश्वरांच्या दारात उभे करायचं आहे. शिवसेना लेचीपेची नव्हती, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.  

आणखी वाचा :
Shiv Sena Party: एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं, निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut Narayan Rane Defamation Case: नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Embed widget