Uddhav Thackeray : ठाकरेंच्या नव्या पक्षाचं नाव काय असणार, मशाल हे चिन्ह तरी कायम राहणार का?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांना 26 फेब्रुवारीपर्यंतच वापरता येणार पक्षाचे नाव आणि मशाल चिन्ह; नंतर काय ?
Uddhav Thackeray : शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा अंतिम निकाल तर लागला. पण तरीही ठाकरेंसाठी संघर्ष अजून संपलेला नाहीय. कारण नव्या पक्षाचं नाव काय असणार, मशाल हे चिन्ह तरी कायम राहणार का याबाबतचे प्रश्न कायम आहेत.
तीन दशकांपासून शिवसेनेची ओळख, शिवसेनेची अस्मिता असलेलं धनुष्यबाण तर ठाकरेंकडून हिरावलं गेलं. चिन्हच नव्हे तर शिवसेना हा पक्षही शिंदेना मिळाला. पण आयोगाच्या निकालानंतरही ठाकरेंचा संघर्ष अजून संपलेला नाही. ठाकरेंच्या पक्षाला नव्या नावासाठी, नव्या चिन्हासाठीही संघर्ष करावा लागणार आहे. चिन्हाबाबत वाद झाल्यानंतर निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला दिलेलं मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तात्पुरतं होतं. काल दिलेल्या निकालात आयोगानं स्पष्ट म्हटलं आहे की हे तात्पुरतं नाव, चिन्ह कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक संपेपर्यंतच त्यांना वापरता येईल. पुन्हा मशाल मिळवण्यासाठी, नव्या पक्षाच्या नावासाठी त्यांना नव्यानं प्रक्रिया करावी लागणार आहे.
शिवसेना हे नाव तर ठाकरेंकडून गेलं, पण आता त्यांच्या पक्षाच्या नावात तरी किमान शिवेसना येऊ शकेल का हाही प्रश्न आहे. शिवसेना नेते दीपक केसरकर तर म्हणतात की साधर्म्य असलेलं नाव निवडणूक आयोग देत नाही. तात्पुरतं चिन्ह मशालही आपल्याजवळ ठेवतील का, इतका पक्षपाती आयोगाचा वाढलाय असं म्हणत ठाकरेंनीही शुक्रवारी टीका केली होती.
सोबतच तात्पुरत्या वादात ठाकरे गटाला जे मशाला मिळालं होतं..त्याचाही त्यांनी जोशात स्वीकार केला..एक अंधेरीची पोटनिवडणूक या चिन्हावर लढवली देखील आहे. या चिन्हावर त्यांना मिळालेली मतंही लक्षणीय होती. त्यामुळे याचा विचार करुन निवडणूक आयोग त्यांना मशाल हे चिन्ह कायम ठेवणार का याचीही उत्सुकता असेल..कारण 2004 पासून सुप्तावस्थेत असलेला समता पक्ष पुन्हा जागा झालाय. मशाल जॉर्ज फर्नांडिस यांच्या काळापासून आमचीच असं म्हणत आज त्यांनी आयोगाला हे चिन्ह ठाकरेंना देऊ नये अशी विनंती केली
अंधेरीच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे या तात्पुरत्या नावावर आणि मशाल चिन्हावर ऋतुजा लटके आमदारही झाल्यात. त्यामुळे पुन्हा नव्या चिन्हाचा विषय आला तर कायदेशीर पेचही निर्माण होणार का. तात्पुरती चिन्हं मिळवतानाही ठाकरे- शिंदे गटात जोरदार संघर्ष झाला होता. त्रिशूळ, उगवता सूर्य हे पर्याय दोघांनीही दिल्यानं बाद झाले होते. आता तर जे नवं चिन्ह असेल तेच ठाकरेंच्या पक्षाशी कायमचं जोडलं जाईल. मशालीबाबत आधीच थोडा प्रचार करुन झाला आहे. त्यामुळे तेच कायम राहिलं तर ठीक नाहीतर ठाकरे गटाला पुन्हा शून्यापासून सगळी सुरुवात करायला लागू शकते.
आणखी वाचा :