Uddhav Thackeray Khed Sabha LIVE: सगळं चोराल पण शिवसेना चोरू शकणार नाही..., उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका
Uddhav Thackeray Khed Sabha LIVE Updates: रामदास कदमांच्या होमग्राऊंडवर उद्धव ठाकरेंची सभा. ठाकरे कोणावर तोफ डागणार? याकडे सर्वांचं लक्ष.
LIVE
Background
Uddhav Thackeray Khed Sabha LIVE Updates: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खेडमध्ये दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंची आज संध्याकाळी रत्नागिरीत सभा होणार आहे. ही सभा रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या खेडमध्ये होणार आहे. खेडच्या गोळीबार मैदानात सायंकाळी पाच वाजता ही जाहीर सभा होणार आहे. नाव आणि चिन्ह गेल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होतेय. त्यामुळे या सभेत उद्धव ठाकरे कोणाचा समाचार घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. विशेष म्हणजे कोकणातील मुस्लिमांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन मुस्लीम सेवा संघानं केलं आहे. उद्धव ठाकरे हे भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवणारे नेते असल्याचा उल्लेख या पत्रात केला आहे. त्यामुळे आजच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदमांचा आज पक्षप्रवेश
खेडच्या गोळीबार मैदानात आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. सायंकाळी पाचता ही जाहीर सभा होणार आहे. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचाही जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांचे निकटवर्तीय माजी बांधकाम सभापती विश्वासकाका कदम हे देखील पक्षात प्रवेश करणार आहेत. या सभेत उद्धव ठाकरे कोणाचा समाचार घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, खेडमधील गोळीबार मैदानावर होणाऱ्या या सभेसाठी भव्य असं व्यासपीठ उभारण्यात येत आहे. लाख ते सव्वालाख लोक जमतील इतकी मैदानाची क्षमता आहे. या व्यासपीठावर शिवसेनेचे सर्व नेते, आजी-माजी आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गट आक्रमक
मुख्यमंत्री शिंदे गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं आहे. त्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. त्यामुळं त्यांच्या या सभेकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. राज्यातील राजकीय वातावरण देखील तापलं आहे.
आज मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची आशिर्वाद यात्रा
दरम्यान, दुसरीकडे आज मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची आशिर्वाद यात्रा निघणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशीष शेलार यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार व दोन्ही पक्षांचे नेते त्यात सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यावर जनजागृती करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप-शिवसेनेकडून सहाही लोकसभा मतदारसंघांत दुचाकी फेरीच्या माध्यमातून आशीर्वाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानापासून आशीर्वाद यात्रेची सायंकाळी पाच वाजता सुरुवात होणार आहे आणि रात्री नऊ वाजता मुंबादेवी येथे समारोप होणार आहे.
Uddhav Thackeray: सगळं चोराल पण शिवसेना चोरू शकणार नाही..., उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका
उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांना शक्य ते दिलं, पण ते आता खोक्यात बंद झाले. आज माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. आज मी तुमच्याकडे मागायला आलोय. तुमची सोबत मला हवी आहे. जे भुरटे चोर, गद्दार आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की, तुम्ही शिवसेना हे नाव चोरू शकाल, पण शिवसेना चोरू शकणार नाही. जिथे रावण आपटला तिथे मिंधे गटाचं काय?
BJP, Shiv Sena Ashirwad Yatra: मुंबईत आज भाजप आणि शिवसेनेची आशीर्वाद यात्रा
BJP, Shiv Sena Ashirwad Yatra: उद्धव ठाकरेंची रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा होत असताना. भाजप आणि शिवसेना मुंबईत ठाकरेंना आव्हान देणार आहे. मुंबईत आज भाजप आणि शिवसेनेची आशीर्वाद यात्रा निघणार आहे. अयोध्येवरून आणलेल्या धनुष्यबाणासह उपनगरात शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार आहे. थोड्याच वेळात घाटकोपर ते मुलुंड दरम्यान भव्य बाईक रॅलीसह आशीर्वाद यात्रा सुरु होणार आहे.. तर संध्याकाळी पाच वाजता आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातदेखील आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर जनजागृती करण्यासाठी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय.
Uddhav Thackeray visit at Ravindra Waikars House: खेडमध्ये दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी
उद्धव ठाकरे खेडमध्ये दाखल झाल्यानंतर ते आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी पोहचलेत. यावेळी एबीपी माझाशी बोलताना रवींद्र वायकर यांनी बोलताना शिंदे गटावर निशाणा साधला आहे. भाजप शिंदे गटाला संपवणार असल्याचा दावा रवींद्र वायकर यांनी केला आहे.
Uddhav Thackeray LIVE: नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिलीच सभा
Uddhav Thackeray LIVE: आज रत्नागिरीतल्या खेडमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिलीच सभा असणार आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. खुर्च्या आणि स्टेज तयार आहे. पदाधिकारी तयारीचा आढावा घेत आहेत.
Uddhav Thackeray Khed Sabha: खेडमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचाही जाहीर पक्षप्रवेश
Uddhav Thackeray Khed Sabha: उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचाही जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांचे निकटवर्तीय माजी बांधकाम सभापती विश्वासकाका कदम हे देखील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.