पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा संताप; मिंधेंच्या नेत्यांची मुले म्हणत भाजपला टार्गेट
पुण्यात 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा आरोप करण्यात आलाय. यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केलीय.
Uddhav Thackeray : पुण्यात 1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपवर टीका केली. मला कोणाच्या मुला बाळाचे प्रकरणवर बोलायचं नाही. आधी मिंदेच्या लोकांचे मुलाचे प्रकरण बाहेर येत होते आत्ता अजित पवार च्या मुलाचे प्रकरण बाहेर आलं आहे. आत्ता मीडिया विचारते यावर तुमची प्रतिक्रिया काय? मी सांगतो काही होणार नाही यात चौकशी करतील आणि क्लीन चिट मिळेल. ते जमिनी कमवतील. तुम्ही बसा असेच असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली.
मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की तुम्ही जे बोललात ते करुन दाखवलं का?
जेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते आणि मी मुख्यमंत्री होतो तेव्हा ते म्हणत होते ओला दुष्काळ जाहीर करा, आता म्हणतात ओला दुष्काळ संज्ञाच नाही अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली. मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की तुम्ही जे बोललात ते करुन दाखवलं का ते सांगा? एक हजार रुपये बक्षीस देतो असेही ठाकरे म्हणाले.
नेमकं प्रकरण काय? (Pune Parth Pawar Land)
1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादस दानवे यांनी केला. महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसांत हा व्यवहार झाला असं अंबादास दानवे म्हणाले.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
या प्रकरणाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या संदर्भात मी सर्व माहिती मागवलेली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्ड संदर्भातील सर्व माहिती मी मागवली आहे. या संदर्भातील योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत, असं म्हणाले. तसेच प्राथमिक चौकशीच्या आधारावर मी यासंदर्भात मी पुढे बोलेल. अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही. प्राथमिक स्तरावर जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत. त्यामुळे त्यावर योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोलले पाहिजे. आज माझ्याकडे या संदर्भात माहिती येणार आहे. ती माहिती आल्यानंतर मी शासनाची पुढची दिशा काय? या प्रकरणात काय कारवाई होणार? या सर्व गोष्टी सांगितल्या जातील.
महत्वाच्या बातम्या:






















