एक्स्प्लोर

भ्रष्टाचारी तेतुका मेळावावा भाजप पक्ष वाढवावा, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला, माणिकराव कोकाटेंनांही काढला चिमटा

मराठा तेतुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असे समर्थ रामदास म्हणाले होते. पण भाजपवाले म्हणतायेत की, भ्रष्टाचारी तेतुका मेळावावा भाजप पक्ष वाढवावा अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली.

Uddhav Thackeray :  मराठा तेतुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असे समर्थ रामदास म्हणाले होते. पण भाजपवाले म्हणतायेत की, भ्रष्टाचारी तेतुका मेळावावा भाजप पक्ष वाढवावा अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. एका मुलाला बापाने विचारले की तुला काय कराचंय? तेव्हा मुलगा म्हणाला की शिकणार मोठा होणार आणि भाजपमध्ये जावून देशकार्य करणार. बाप म्हणाला की तुला असं करायचं असेल तर डायरेक्ट भाजपमध्ये जायचं नाही, आधी दुसऱ्या कोणत्यातरी पक्षात जायचं काहीतरी गडबड घोटाळा कर मग तुला भाजपमध्ये सन्मानाने बोलवतील असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर प्रहार केला.

बऱ्याच वर्षानंतर एका माणसाला त्याच्या आवडीचे खाते मिळाले

बऱ्याच वर्षानंतर एका माणसाला त्याच्या आवडीचे खाते मिळाले आहे असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी क्रिडा मंत्री माणिकराव कोकाटेंना टोला लगावला. रमीला ऑलिम्पिकमध्ये मान्यता मिळेल अशी खोचक टीका देखील कोकाटेंवर त्यांनी केली. ससून डॉकच्या जागेविषयी केंद्र व राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या वादामुळे कोळी बांधवांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना तुम्ही आहात तुमच्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. कालांतराने ज्यांच्यासाठी लढलो ते गायब होऊ नका असेही ठाकरे म्हणाले.  

शिवसेनेची स्थापना भूमिपुत्रांना न्याय आणि हक्क देण्यासाठी

अन्याय तोडून टाका असे उद्धव ठाकरे म्हणाले. अन्याय सहन करायचा नाही असे ठाकरे म्हणाले. सरकार एका बाजूला सांगत आहे की आम्ही भाडे भरु. सरकारने पैसे भरले नाहीत, मग मध्ये पैसे कोणी खाल्ले? असा सवाल ठाकरेंनी केला. कोरोनाचा काळ हा अत्यंत वाईट होता. मी अनपेक्षितपणाने मुख्यमंत्रीपद स्वीकारले होते असेही उद्धव ठाकरे म्हणाले. या काळात बऱ्याच गोष्टी आपण करु शकलो नाही. आपलं सरकार आलं असतं तर तुमच्यावर लढण्याची वेळच आली नसते. शिवसेनेची स्थापना भूमिपुत्रांना न्याय आणि हक्क देण्यासाठी झाली असल्याचे ठाकरे म्हणाले. सरकार महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघाले आहे असे ठाकरे म्हणाले. आम्हाला भाषेचा दोष नाही पण सक्ती करु नका. 

पियूष गोयल म्हणाले होते की, कोळ्यांचा वास येतो मग त्यांच्या मताला वास येत नाही का? असा टोला उद्धव ठाकरेंनी गोयल यांना लगावला. मंत्र्यांच्या वयाच्या किती तरी जुनी सासून डॉक असल्याचे ठाकरे म्हणाले. मी मंत्री असताना अनेक वादळे आली तेव्हा मच्छीमार किती आत आहेत विचारायचो. एकजूट मजबूत ठेवा असे ठाकरे म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget