एक्स्प्लोर
शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची यादी 'माझा'च्या हाती, आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून लढणार
शिवसेना-भाजप युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली आहे. तसेच शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
मुंबई : शिवसेना-भाजप युतीची घोषणा होण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली आहे. तसेच शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. या यादीनुसार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेनेने वरळी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. मराठवाड्यातील पैठण, औरंगाबाद, जालना, हिंगोली, तर कोल्हापुरात हातकणंगले, पुण्यात पिंपरी, आणि मुंबईतल्या शिवडी मतदारसंघातल्या इच्छुकांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं आहे.
दरम्यान, नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपच्या उमेदवारांची यादी निश्चित करण्यात येत आहे. आज संध्याकाळपासून दिल्लीतल्या भाजप कार्यालयात भाजपच्या निवडणूक समितीची बैठक सुरू आहे.
शिवसेनेच्या मुंबईतील संभाव्य उमेदवारांची यादी
1. भायखळा :- यामिनी जाधव
2. शिवडी :- अजय चौधरी
3. वरळी :- आदित्य ठाकरे
4. माहfम :- सदा सरवणकर
5. वांद्रे पूर्व :- विश्वनाथ महाडेश्वर
6. कलिना :- संजय पोतनीस
7. चांदिवली :- दिलीप मामा लांडे
8. कुर्ला :- मंगेश कुडाळकर
9. मानखुर्द-शिवाजीनगर :- विठ्ठल लोकरे
10. चेंबूर :- प्रकाश फातर्फेकर
11. अणुशक्ती नगर :- तुकाराम काते
12. अंधेरी पूर्व :- रमेश लटके
13. दिंडोशी :- सुनिल प्रभू
14. जोगेश्वरी पूर्व :- रवींद्र वायकर
15. मागाठाणे :- प्रकाश सुर्वे
16. विक्रोळी:- सुनिल राऊत
17. भांडूप पश्चिम :- अशोक पाटील
एबी फॉर्मचे वाटप झालेले उमेदवार (मुंबई सोडून राज्यातील इतर ठिकाणच्या इच्छुकांना एबी फॉर्म दिले आहेत.)
1. राजेश क्षीरसागर -
2. संग्राम कुपेकर - चंदगड (कोल्हापूर)
3. संदीपान भुमरे - पैठण
4. संजय शिरसाट - औरगाबाद पश्चिम
5. अर्जुन खोतकर - जालना
6. सुजित मिणचेकर - हातकणंगले (कोल्हापूर)
7. संतोष बांगर - हिंगोली
8. अजय चौधरी - शिवडी (मुंबई)
9. गौतम चाबुकस्वार - पिंपरी (पुणे)
10. उदय सामंत - रत्नागिरी
11. भास्कर जाधव - गुहागर
12. योगेश कदम - दापोली
13. राजन साळवी - राजापूर
14. अनिलराव बाबर - खानापूर-आटपाडी (सांगली)
15. अनिल कदम - निफाड (नाशिक)
16. योगेश घोलप - देवळाली (नाशिक)
17. राजाभाऊ वाजे - सिन्नर (नाशिक)
18. यामिनी जाधव - भायखळा (मुंबई)
दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, तिकीटवाटपावर शिक्कामोर्तब होणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement