(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Udayanraje Bhosale : यांना लाज कशी वाटत नाही? बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? उदयनराजे भोसलेंचा राज्यपाल, सुंधाशू त्रिवेदींवर कडाडून प्रहार
Udayanraje Bhosale : आदर्श भारताची संकल्पना मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जुने कसे झाले? राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावाला आधार काय? अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी हल्ला चढवला.
Udayanraje Bhosale : आदर्श भारताची संकल्पना मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जुने कसे झाले? राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावाला आधार काय? शिवरायांचे विचार जुने झाले, तर मुघलांना एकमेव शिवरायांनी विरोध केला होता. लोकांच्या सन्मानासाठी विरोध केला होता. गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी केला होता आणि हे म्हणतात छत्रपतींचा विचार जुना झाला, अशा शब्दात छत्रपती शिवरायांचे थेट वंशज उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या बेताल वक्तव्याचा समाचार घेतला.
उदयनराजे भोसले यांनी भाजपचे प्रवक्ते सुंधाशू त्रिवेदी यांच्या हकालपट्टीची मागणी केली. पुढील भूमिका त्यांनी 28 नोव्हेंबर रोजी स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. यापुढे शिवरायांचा अवमान सहन करणार नाही, अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास नेस्तनाबूत करू, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. उदयनराजे पुढे म्हणाले की, विकृती ही विकृती असते, त्याला जात, पात, धर्म नसतो. उदयनराजे यांनी राज्यपाल विचार जुना झाल्याचे म्हणत असताना व्यासपीठावर असलेल्यांनी आक्षेप का घेतला नाही?शिवरायांचा अपमान होत असताना गप्प का बसता? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
अनेक देशात योद्धे होऊन गेले पण त्यांनी आपल्या लढाया आपल्या साम्राज्यासाठी केल्या, पण शिवरायांनी गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी लढाया केल्या. आधुनिक भारताची संकल्पना त्यांनी त्यावेळीच मांडली. शिवाजी महाराज स्फूर्तीस्थान आहेत. आजपर्यंत कोणाचा आदर्श घेऊन वाटचाल झाली? त्रिवेदी म्हणाला माफी मागितली, याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? यांना लाज वाटत नाही का? हे सर्व वेदनादायी असून अशा वक्तव्यांनी चीड येते. शिवरायांनी सर्वधर्मसमभावाची मांडणी त्यांनी केली. धर्मस्थळांचा त्यांनी सन्मान केल्याचे उदयनराजे म्हणाले.
शिवाजी महाराज जुन्या युगाचे हिरो
राज्यात आल्यापासून वादाची माळ लावून सोडलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले होते की, आम्ही शाळेत असताना आम्हाला शिक्षक विचारत होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. त्यामुळे कोणाला सुभाषचंद्र भोस, कोणाला महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू आवडायचे. त्यामुळे मला असे वाटते की, तुम्हाला जर कोणी विचारले तुमचे आवडत हिरो कोण आहे. तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला महाराष्ट्रातचं ते सापडून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाची गोष्ट आहे, मी नवीन युगाची गोष्ट सांगतोय असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. नितीन गडकरीपर्यंत तुम्हाला इथेच भेटून जातील असेही कोश्यारी म्हणाले.
जोडे काय असतात आणि कसे मारले जातात हे दाखवून देऊ
खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज्यपालांना हटवण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडून अधिकृतपणे केली पाहिजे, अन्यथा जोडे काय असतात आणि ते कसे मारले जातात? हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली असं विधान भाजपच्या प्रवकत्यांनी केलं, हे भाजपला मान्य आहे का? छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी माफी मागितली? हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे. कारण ते भाजपचे सहयोगी आहेत, मुख्यमंत्री आहेत. वीर सावरकरांबद्दल रस्त्यावर उतरले होते, जोडे मारले होते, स्वागत आहे. आता हे जोडे कोणाला मारणार आहात? भाजपच्या प्रवक्त्यांना की राज्यपालांना? मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर दिलं पाहिजे,' असं राऊत यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या