एक्स्प्लोर
हजारो समर्थकांसह उदयनराजेंचं साताऱ्यात शक्तीप्रदर्शन
उदयनराजे भोसले यांचा जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळल्यानंतर त्यांनी काल (शुक्रवारी) रात्री साताऱ्यात पदयात्रा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.

सातारा: खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर काल (शुक्रवारी) रात्री उशीरा उदयनराजे अचानक साताऱ्यात आले. यावेळी हजारो समर्थकांच्या साथीनं त्यांनी साताऱ्याच्या रस्त्यावरुन चालत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. दरम्यान, उदयनराजे आता स्वत: पोलीस ठाण्यात हजर होणार का? याबाबत सध्या सातारकरांना उत्सुकता लागली आहे. लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासोबत तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे. उदयनराजे यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण हायकोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता उदयनराजे स्वत: पोलीस ठाण्यात हजर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उदयनराजे यांनी हजारो समर्थकांसह साताऱ्यात जोरदार एंट्री केली. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आले. पदयात्रेदरम्यान आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे भोसले यांचीही धावती भेट घेत विचारपूस केली. या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून सध्या चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, या पदयात्रेवेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चक्क फटाकेही फोडले. रात्री उशिरा उदयनराजे पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण अद्याप तरी उदयनराजे पोलिसांसमोर हजर झालेले नाहीच. आज ते हजर होण्याची शक्यता आहे. संबंधित बातम्या: उदयनराजे भोसले पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता
Before You Go
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















