एक्स्प्लोर

Success Story Swapnil Patil : सहा महिने अंथरुणाला खिळून होता, जिद्द उरी पेटली, अर्जुन पुरस्कारावर मोहर उमटवली, स्वप्नील पाटीलचा प्रवास 

Success Story Swapnil Patil : पॅरालिम्पिकमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारा स्वप्नील पाटील हा कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू आहे.

Success Story Swapnil Patil : आपल्या वाढदिवसाला मित्रांना बोलावण्यासाठी सायकलवरून जात असताना अपघात झाला. अपघातात उजव्या मांडीचे हाड तुटले. त्यामुळे जवळपास सहा महिने अंथरुणावर खिळून होता. उपचार सुरु असताना डॉक्टरांनी स्विमिंग वॉटर थेरपी सुचवली. पुढील तीन महिन्यात तो स्वतःच्या पायावर उभा राहिल्यानंतर तो थांबला नाही. अखेर 2022 ला त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही कहाणी आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील पॅरा ऑलिम्पिकपटू स्वप्नील पाटीलची (Swapnil Patil). 

स्वप्नील संजय पाटील यांचा जन्म 6 जानेवारी 1998 रोजी कोल्हापूर (Kolhapur) येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव संजय वसंत पाटील असे असून ते व्यवसायाने पॅरा स्विमिंग कोच म्हणून स्वप्नील स्विमिंग अकादमी, कोल्हापूर येथे काम करतात तर आई लता पाटील या गृहिणी आहेत. स्वप्नील सध्या एम. ए. प्रथम वर्षात शिकत असून बंगळुरू येथील झी स्विम अकॅडेमीत स्विमिंगचे प्रशिक्षण घेत आहे. स्वप्नीलच्या जलतरण (Swimming)  कारकीर्दीची सुरुवात वयाच्या 6 व्या वर्षी झाली. स्वप्नील आपल्या वाढदिवसाचे निमंत्रण देण्यासाठी सायकलवरून आपल्या मित्रांना वाढदिवसाच्या पार्टीला बोलावण्यासाठी जात असताना त्याचा तोल गेला आणि त्याच्या उजव्या मांडीचे हाड तुटले. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यामुळे तो  6 महिने अंथरुणाला खिळला होता. त्यानंतरही त्याने प्रयत्न करूनही तो त्याच्या पायावर उभा राहू शकला नाही. 

दरम्यान उपचार सुरु असताना डॉक्टरांनी स्विमिंग वॉटर थेरपी सुचवली, वॉटर थेरपीमुळे 3 महिन्यांत तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला. त्यामुळे त्याचा पोहण्यात रस वाढत गेला आणि एक खेळाडू म्हणून त्याने सुरुवात केली. त्यानंतर तो थांबला नाही. स्वप्नीलला 2006 मध्ये पहिले राष्ट्रीय पदक मिळाले. त्यानंतर काही वर्षांनी त्याला आंतरराष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धा (Para Olympic) 2011 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत पहिल्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये 4 सुवर्णपदके मिळाली. तसेच 2014 मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक, 2018 च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये 1 रौप्य आणि 2 कांस्यपदक जिंकले. कदाचित त्याचमुळे त्याच्या नावावर भारताचा जलदगती जलतरणपटू हा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. 

स्वप्नीलला महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कार 2019 माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या हस्ते तसेच भारतातील दुसरा-सर्वोच्च प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार अर्जुन पुरस्कार 2022 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्राप्त झाला आहे. तर येत्या ऑक्टोबर 2023 मध्ये चीन येथे होणाऱ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झालेला असून पॅरा ऑलिम्पिक 2024 मधेही भारतासाठी सुवर्ण पदक कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्याने म्हटलं आहे.

अन् व्हिसा नाकारला.... 

स्वप्नील पाटीलने आतापर्यंत आपल्या जिद्दीच्या जोरावर उत्तुंग यश प्राप्त केले आहे. यावर तो म्हणतो कि, आता पर्यंतचा एकूण अनुभव सुखदः होता. लहान असताना आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी एका दुसऱ्या देशात जायचे होते. त्यावेळी त्याच्या वडिलांनी पैशांची जमवा जमाव करून व्हिसासाठी पैसे भरले. पण समोरील देशाने वय कमी असल्याकारणाने व्हिसा नाकारला. त्याला खूप वाईट वाटले कि आपल्याला आपल्या देशासाठी खेळायची संधी नाही मिळाली. पण तरीही जिद्दीने त्याने आपला सराव सुरु ठेवत पॅरा ऑलिम्पिक पर्यंत मजल मारली.

सगळं आईवडिलांचं श्रेय 

जलतरणपटू म्हणून जेव्हा स्पर्धेत उतरण्याची तयारी केली. त्यावेळी वडिलांनी योग्य मार्गदर्शन केले. त्यानंतर माघारी फिरलो नाही. वडिलांनी अनेक चांगल्या वाईट प्रसंगी कसे वागायचे, कधी हिंमत हरतोय असं वाटलं तर त्यांनी प्रोत्साहन दिले, असा आवर्जून सांगतो. तसेच माझ्या आई वडिलांना माझा खूप अभिमान वाटावा आणि माझ्या कामगिरीमुळे त्यांचेही नाव व्हावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे स्वप्नील म्हणतो. 

आता पर्यंतची कामगिरी 

 IWAS वर्ल्ड ज्युनियर गेम्स 2013, USA - 4 सुवर्णपदक, आशियाई पॅरा गेम्स 2014 दक्षिण कोरिया - 1 कांस्य, आशियाई पॅरा गेम 2018 इंडोनेशिया जकार्ता - 1 स्लिव्हर 2 कांस्य, 22 वी राष्ट्रीय पॅरा चॅम्पियनशिप 2022 - गुवाहाटी, 4 सुवर्ण पदके, 1 रौप्य पदक, इतर पदके: राष्ट्रीय एकूण पदके - 33 सुवर्ण, 13 रौप्य , 14 कांस्य - 60 राष्ट्रीय पदके, आंतरराष्ट्रीय पदक - 12 सुवर्ण, 4 रौप्य , 10 कांस्य, आशियाईतील कामगिरीबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. तसेच भारतातील सर्वात वेगवान पॅरा जलतरणपटू म्हणूनही त्याचा नावलौकिक आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 07 July 2024Worli Hit Run : ती बीएमडब्लू मिहीरच चालवत होता, मृत महिलेच्या पतीचा दावाSupriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Embed widget