एक्स्प्लोर
सेल्फीच्या नादात खोल दरीत कोसळून दोघांचा मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली येथे दरीजवळ सेल्फी काढणं दोघांच्या जीवावर बेतलं आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली कावळेसाद येथे काल (सोमवार) संध्याकाळी ६च्या सुमारास सेल्फी काढण्याच्या नादात दोन पर्यटकांचा सुमारे ५०० ते ६०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची माहिती समजते. इम्रान गारदी आणि प्रताप राठोड अशी दरीत कोसळलेल्या दोघांची नावं आहेत.
काल रात्री उशिरा आंबोली पोलीस स्थानकात दोघे जण दरीत पडल्याची तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर आज सकाळी ८ वाजल्यापासून शोधकार्य सुरु करण्यात आलं. बाबल अल्मेडा व त्यांच्या टीमने सुमारे दोन तास चालत जाऊन दोघांचा शोध घेतला. यावेळी इम्रान गारदीचा मृतदेह हाती लागला. मात्र, प्रताप राठोड याचा शोध अद्यापही सुरुच आहे. या शोधकार्यात कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनाचेही प्रयत्न सुरु होते.
उद्या पुन्हा सकाळी प्रताप राठोडचा शोध घेण्यात येणार आहे. आज पाऊस आणि दाट धुकं यामुळे शोधकार्यात बराच व्यत्यय येत होता. असं असूनही अल्मेडा आणि त्यांच्या टीमनं इम्रान गारदीचा मृतदेह शोधून काढला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement