अकोल्यात कूलरचा शॉक लागून दोन चिमुकल्या मूलींचा दुर्दैवी मृत्यु; तर अलिबागच्या तलावात दोन मुले बुडाली
अकोला आणि अलिबागच्या मूनवली शहरातून दोन वेगवेगळ्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. यात अकोल्यात कूलरचा शॉक लागून दोन चिमुकल्या मूलींचा दुर्दैवी मृत्यु झालाय तर अलिबागच्या तलावात दोन मुले बुडाली आहेत.
Akola News अकोला : अकोला (Akola News) आणि अलिबाग (Alibaug) जिल्ह्यातील मूनवली शहरातून दोन वेगवेगळ्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. यात अकोल्यात कूलरचा (Cooler) शॉक लागून दोन चिमुकल्या मूलींचा दुर्दैवी मृत्यु झालाय. तर अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील तलावात दोन मुलं बुडाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, अकोल्यात मागील दीड महिन्यात आतापर्यंत कुलरचा शॉक लागून 5 लोकांचा मृत्यु झाला आहे.
अशातच आता अकोला (Akola News) जिल्ह्यातील काळेगाव येथे अशीच घटना घडली आहे. यात 4 वर्षीय ईशानी प्रवीण ढोले आणि 5 वर्षीय प्रियांशी सोपान मेतकर असं कुलरचा शॉक लागून मरण पावलेल्या मुलींची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली असून या दोन चिमुकल्यांच्या मृत्यूच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
कूलरचा शॉक लागून दोन चिमुकल्या मूलींचा दुर्दैवी मृत्यु
अकोला जिल्ह्यातील काळेगाव येथे या अपघातात मृत पावलेल्या दोन्ही मुली आपल्या मामाकडे राहायला आल्या होत्या. दरम्यान आज दुपारी घरात खेळत असतांना अचानक त्यांचा कूलरला हात लागला. दरम्यान, त्यांना जोरदार शॉक लागला अन् यात दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे एकट्या अकोला जिल्ह्यात कूलरचा शॉक लागून 5 लोकांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे कूलरमधील तांत्रिक बिघाड जीवघेणा ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. तसेच महावितरण कडून देखील याबाबत माहिती दिली जात आहे. मात्र या घटनेमुळे परत एकदा कूलर विषयी सावधगिरी बाळगणे फार महत्वाचे ठरते आहे.
अलिबाग तालुक्यातील मुनवली तलाव येथे दोन मुले बुडाली
दरम्यान अशीच एक दुर्दैवी घटना अलिबाग तालुक्यातील मूनवली येथे घडली आहे. यात मूनवली येथील तलावात दोन मुलं बुडाल्याची घटना घडली आहे. त्यापैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. तर आणखी एक जण बेपत्ता असून त्याचा शोध सध्या घेतला जात आहे. मूनवली येथील अथर्व शंकर हाके (वय अंदाजे 16 वर्षे) असे मृतदेह सापडलेल्या मुलाचे नाव असून दुसरा तुडाळ भागातील मुलगा असून त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या घटनेमुळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या