एक्स्प्लोर

कोरोनाच्या तपासणीसाठी आणलेले दोन कैदी फरार, बीड जिल्हा रुग्णालयातील घटना

बीडमध्ये दोन कैदी रुग्णालयातून फरार झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही कैद्यांना कोरोना व्हायरसची तपासणी करण्यासाठी बीड जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं होतं.

बीड : कोरोना व्हायरसची तपासणी करण्यासाठी रुग्णालयात आणलेले दोन कैदी फरार झाल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. या दोन्ही कैद्यांवर गंभीर स्वरुपाच्या गुन्हांची नोंद आहे. बीड शहराच्या जिल्हा रुग्णालयातून या कैद्यांनी पळ काढला आहे.

कारागृहात असलेल्या कैद्यांना कोरोना तपासणीसाठी बीड शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांचा स्वॅब पाठवल्यानंतर सुरक्षा यंत्रणेला चकवा देत संबंधित दोन्ही कैदी जिल्हा रुग्णालयातून फरार झाले. सोमवारी रात्री 10 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचा स्वॅब घेतला आहे.

सिरसाळा येथील हे दोन आरोपी जिल्हा कारागृहात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिक्षा भोगत होते. काल त्यांना जिल्हा रुग्णालयात कोरोनाची तपासणी करण्यासाठी दुपारी पोलिस बंदोबस्तात आणण्यात आलं. यावेळी संबंधित डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचा स्वॅब घेतला. यानंतर परत कारागृहात पाठवण्यासाठी त्यांचा स्वॅब येण्याची वाट पाहावी लागत होती. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयातच ठेवण्यासाठी पोलीस वार्डात घेऊन गेले.

मात्र तो वार्ड दुसरीकडे शिफ्ट झाल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्यावेळी रात्रीचा अंधार आणि गोंधळाचा फायदा उचलत दोन्ही आरोपी फरार झाले. पोलिसांनी आरोपीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत. याप्रकरणी शहर ठाण्यात आरोपी फरार झाल्याची तक्रार पोलिसांनी दाखल केली आहे. दरम्यान पोलिसांनी या आरोपींना पकडण्यासाठी पथकांची स्थापना केली आहे.

संबंधित बातम्या 

 Coronavirus | ज्येष्ठांपाठोपाठ वजन जास्त असलेल्यांना कोविडचा धोका
मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
Dhananjay Munde : स्वर्गीय अजित दादांनी माझे जिवलग मित्र इंद्रनील नाईकांना मंत्री केलं, दोघंही मंत्री झालो असतो तर...; भर कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत
स्वर्गीय अजितदादांनी माझे जिवलग मित्र इंद्रनील नाईकांना मंत्री केलं, दोघंही मंत्री झालो असतो तर...; भर कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली खंत
Maharashtra Rain: पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, IMDचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान विभागाचा राज्यासाठी महत्वाचा इशारा

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
Embed widget