एक्स्प्लोर

Omicron: मंत्रालयातील दोन पोलीस कर्मचारी आणि एका क्लार्कला ओमायक्रॉनचा संसर्ग

Omicron: तिघेही केडीएमसीच्या विलगीकरण सेंटर मध्ये दाखल झाले आहेत.

Omicron: मंत्रालयात ड्युटी करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यासह एका लिपिकाला ओमायक्रोनचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आलीय. यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर 20 डिसेंबरपासून उपचार सुरु असून इतर दोघांना बुधवार 29 डिसेंबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी पाटील यांनी दिली.

महाराष्ट्रातील पहिला ओमायक्रोनचा रुग्ण कल्याणमध्ये सापडला होता. हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून आला होता. तर, नायझेरियातून आलेल्या दुसऱ्या रुग्णाला देखील ओमायक्रोन झाल्याचं निदान झालं होतं. मात्र, या दोन्ही रुग्णांनी त्यावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पुन्हा ओमायक्रॉनची लागण झालेले तीन रुग्ण सापडले. हे तिन्ही रुग्ण मंत्रालयातील कर्मचारी आहे. मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची प्रत्येक आठवड्याला कोरोना चाचणी केली जाते.

मंत्रालयात मागील आठवड्यात  करण्यात आलेल्या टेस्टिंगमध्ये एक पोलीस कर्मचारी कोरोना पोझीटीव्ह आल्यानं त्याच्या स्वबचे नमुने जीनोम सिक्वेन्सिगसाठी पाठवण्यात  आले होते. पॉझिटिव्ह आल्यानंतर हा कर्मचारी होम क्वारंनटाईन झाला. त्याचा ओमायक्रोनचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला पालिकेच्या विलगीकरणात दाखल करण्यात आले. काल आणखी दोघांचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला. यातील एक जण मंत्रालयात पोलीस कर्मचारी असून दुसरा लिपिक आहे. तिघांना पालिकेच्या आर्ट गॅलरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कोणतेही लक्षणे नाहीत. तर, त्यांच्या कुटुबिंयांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचे अहवाल प्रलंबित असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय. 

मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णाची कमी होत असलेली रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागलीय. कालच्या तुलनेत शहरातील रुग्णसंख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. आज शहरात 67 रुग्ण सापडले असून उपचाराधीन रुग्णाची संख्या 354 वर पोचलीय. मात्र, यातील 90 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत किंवा अतिशय सौम्य लक्षणे असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली. त्यामुळं नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget