एक्स्प्लोर

The Kashmir Files: द कश्मीर फाइल्स पाहिल्यानंतर दोन गटात हाणामारी, 15 जणांना अटक

Amaravati: अमरावती जिल्ह्यात ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

Amaravati: अमरावती जिल्ह्यात ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत 15 तरुणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट पाहून परतणाऱ्या एका गटाने रस्त्यावर जय श्री रामच्या घोषणा दिल्या. यावरूनच दुसरा गट आणि चित्रपट पाहून आलेल्या या गटात जोरदार वादावादी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की या दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. 

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण अमरावती जिल्ह्यातील लाल पूल परिसरातील आहे. अचलपूर येथील एका सिनेमागृहातून चित्रपट पाहून परतणाऱ्या तरुणांच्या एका गटाने लाल पुलाजवळ येऊन जय श्री रामचे नारे लगावले. यावेळी त्याच परिसरातील आझाद नगरमध्ये राहणाऱ्या तरुणांच्या आणखी एका गटाने याचा विरोध केला. यावरून या दोन्ही गटांमध्ये मोठा वाद झाला आणि नंतर या दोन्ही गटात हाणामारी सुरू झाली. या मारामारीत अनेक तरुण जखमी झाले आहेत.

द कश्मीर फाइल्सवर बंदी घाला, विरोधी पक्षाची मागणी

द कश्मीर फाइल्स या चित्रपटाबाबत विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक लोक या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. तर जवळपास 9 राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. यातच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी लोकसभेत काश्मिरी पंडितांच्या पलायन विरोधात आवाज उठवला आहे. 1990 मध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांच्या पलायनवरून त्यांनी भाजपवर हल्लाबोल करत म्हणाले आहेत की, जेव्हा काश्मिरी पंडितांना घरे सोडण्यास भाग पाडले जात होते, तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते राजीव गांधी यांनी तत्कालीन व्ही पी सिंग सरकारला काश्मीरमध्ये पंडित आणि शिखांवर सुरु असलेले अत्याचार थांबवा, अशी विनंती केली होती.

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, 1990 मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांचे सरकार भाजपच्या पाठिंब्यावर चालत होते आणि त्यावेळी जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांनी स्थलांतरित पंडित आणि शीखांना सांगितले होते की, 'आम्ही तुम्हाला वाचवू शकत नाही. तुम्ही येथून बाहेर निघा.'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशकात 800 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप, आता शिवसेनेकडून राऊतांना जशास तसं उत्तर!
नाशकात 800 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप, आता शिवसेनेकडून राऊतांना जशास तसं उत्तर!
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरात विहंगम दृश्य; भगवान विष्णुंना सोनेरी किरणांचा सोनसळी अभिषेक
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरात विहंगम दृश्य; भगवान विष्णुंना सोनेरी किरणांचा सोनसळी अभिषेक
Fact Check : भाजपाच्या प्रचार बॉक्समध्ये खरंच सोन्याची बिस्किटे सापडली होती का ? वाचा सत्य
भाजपाच्या प्रचार बॉक्समध्ये खरंच सोन्याची बिस्किटे सापडली होती का ? वाचा सत्य
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील प्रकृती खालावल्याने दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे पाटील प्रकृती खालावल्याने दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bhiwandi Rain : अवकाळी पावसामुळे घराचे पत्रे उडाले; पावसाने मोठं नुकसानChanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 17 मे 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 17 May 2024Chhagan Bhujbal Full PC: तुमच्याकडचे अनेक लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक, भुजबळांचा जयंत पाटलांना टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशकात 800 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप, आता शिवसेनेकडून राऊतांना जशास तसं उत्तर!
नाशकात 800 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याचा मुख्यमंत्र्यांवर आरोप, आता शिवसेनेकडून राऊतांना जशास तसं उत्तर!
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरात विहंगम दृश्य; भगवान विष्णुंना सोनेरी किरणांचा सोनसळी अभिषेक
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरात विहंगम दृश्य; भगवान विष्णुंना सोनेरी किरणांचा सोनसळी अभिषेक
Fact Check : भाजपाच्या प्रचार बॉक्समध्ये खरंच सोन्याची बिस्किटे सापडली होती का ? वाचा सत्य
भाजपाच्या प्रचार बॉक्समध्ये खरंच सोन्याची बिस्किटे सापडली होती का ? वाचा सत्य
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील प्रकृती खालावल्याने दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे पाटील प्रकृती खालावल्याने दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल
Beed Lok Sabha: कोण होणार बीडचा खासदार? अटीतटीच्या संघर्षात भाजपाचे कमळ फुलणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार?
कोण होणार बीडचा खासदार? अटीतटीच्या संघर्षात भाजपाचे कमळ फुलणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार?
Avinash Bhosale : मोठी बातमी! अविनाश भोसले यांना मोठा दिलासा, एक लाखांच्या जातमुचलक्यावर अखेर जामीन मंजूर
मोठी बातमी! अविनाश भोसले यांना मोठा दिलासा, एक लाखांच्या जातमुचलक्यावर अखेर जामीन मंजूर
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
Rakhi Sawant Health Updates : रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...
Embed widget