एक्स्प्लोर
बीडमध्ये दोन कोटी रुपयांची रोकड पोलिसांकडून जप्त, प्राप्तिकर विभागाकडून चौकशी सुरु
पोलीस उपअधीक्षक, निवडणूक अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होत चौकशी केली. सदर रकमेचा कोणत्या राजकीय पक्षाशी काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
बीड : बीड कल्याण महामार्गावर अमळनेर चेक पोस्ट येथे तब्बल दोन कोटी रुपयांची रोकड पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. पाटोदा उपविभागीय दंडाधिकारी यांनी ही कारवाई केली. सदर रोख रक्कम बीडच्या एका मल्टिस्टेटची असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
ज्या गाडीतून रोख घेऊन जात होते ती गाडी बीडच्या एका दैनिकाच्या नावावर असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. पोलीस उपअधीक्षक, निवडणूक अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होत चौकशी केली. सदर रकमेचा कोणत्या राजकीय पक्षाशी काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. या रकमेसंदर्भात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
बीड येथील विजय बंब यांच्या मालकीच्या कारमधून त्यांचा मुलगा प्रशांत बंब हा ड्रायव्हर सह अहमदनगरकडे जात असताना पांढरवाडी फाट्याजवळ ही कार पोलिसांनी चेकपोस्ट वर तपासली. या गाडीच्या डिक्कीमध्ये नोटांनी भरलेल्या पाच गोण्या सापडल्या. दरम्यान ही रक्कम जैन पतसंस्थेची असल्याचा दावा बंब कुटुंबीयांनी केला आहे. ही सर्व रक्कम परळी शाखेत घेऊन जायचे असल्याची माहिती बंब यांनी पोलिसांना दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement