एक्स्प्लोर
ऊसतोड मजुराच्या मुलांचा होरपळून मृत्यू, बीड जिल्ह्यातील घटना
बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील बंजारा नगर भागातील ही घटना आहे.

बीड : ऊसतोड कामगाराच्या दोन चिमुकल्या मुलांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील बंजारा नगर भागातील ही घटना आहे. शहरातील बंजारा नगर भागातील विजय जाधव हे ऊसतोड कामगार आहेत. ऊसतोडणीसाठी ते पत्नीसह कर्नाटक राज्यात आहेत. त्यांची मुलं आज्जी-आजोबांकडे राहतात. चुलीवर ठेवलेलं पाणी अंगावर पडल्याने या चिमुकल्यांचा मृत्यू झाला. वैष्णव (वय 6 वर्ष) आणि वैभव (वय 3 वर्ष) आजी आजोबा यांच्याकडे सांभाळ करण्यासाठी ठेवलेले होते. आंघोळीसाठी चुलीवर पाणी गरम करण्यास ठेवलं होतं. थंडीमुळे चुलीजवळ बसलेल्या या दोन मुलांच्या हे गरम पाणी अंगावर पडल्याने दोघांचाही होरपळून मृत्यू झाला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















