एक्स्प्लोर

चाळीसगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली मिळालेले अस्थी कलश बाबासाहेबांचे असल्याचा दावा

चाळीसगावा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली मिळालेले दोन अस्थी कलश बाबासाहेब आंबेडकर यांचे असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नुतनी करणाचं काम सुरू असताना पुतळ्याच्या खाली असलेल्या चबुतऱ्यामध्ये दोन अस्थी कलश आढळून आल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात उघडकीस आली आहे. हे दोन्ही अस्थी कलश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. या ठिकाणी अनेकांनी या कलशाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात सदर बाजार डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात 1958 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आल्याचे  स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे, या पुतळ्याच्या खाली चाळीसगाव शहरातील शामजी जाधव घराण्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणानंतर आणलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थी कलश हे या पुतळ्याखाली ठेवण्यात आल्याची माहिती चाळीसगाव शहरातील जुने जाणते सांगत असत, जुन्या जाणत्या लोकांची माहिती चर्चेत असताना आज पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी उत्खनन केले जात असताना या पुतळ्याच्या चबुतऱ्याखाली दोन अस्थीकलश आढळून आल्याने ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच असल्याचा दावा स्थानिकांनी केला  आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थीकलश आढळून येणे ही चाळीसगाव वासियांच्या दृष्टीने भाग्याची आणि आनंदाची बाब असल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे.

या घटनेच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाने या घटनेला दुजोरा देताना म्हटल आहे की चाळीसगाव शहरात पालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची पूनरस्थापना करीत असताना या ठिकाणी दोन अस्थी कलश आढळून आले आहेत. जुन्या मंडळीच्या सांगण्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे अस्थी कलश आहेत. स्थानिक प्रशासनाने अतिशय काळजी आणि श्रद्धापूर्वक यावर नियंत्रण मिळविले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पुतळ्याच्या ठिकाणीच हे अस्थीकलश पुन्हा स्थापित करण्यात येणार आहेत. या घटनेसंदर्भात काही ऐतिहासिक दस्तावेज मिळतो का ते शोधले जाईल आणि तो आढळून आला तर जिल्ह्याच्या दृष्टीने हा अतिशय अमूल्य ठेवा असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
Nashik News: रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना
रस्त्यावर जखमी दिसला की गाडी थांबवून मदतीला धावायचा; शेकडो अनोळखींसाठी आधार ठरलेल्या विशालला काळाने हिरावून नेलं, नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
Embed widget