एक्स्प्लोर

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले, पंचगंगेच्या पातळीत होणार वाढ

गेल्या तीन दिवसांपासून पावसाची मुसळधार बरसात सुरू असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. स्वयंचालित दरवाज्यातून विसर्ग सुरू झाल्याने नदीच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे उघडले आहेत. 3 आणि 6 नंबरचा दरवाजा आज सायंकाळी सात वाजता उघडला. गेल्या तीन दिवसांपासून पावसाची मुसळधार बरसात सुरू असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. स्वयंचालित दरवाज्यातून विसर्ग सुरू झाल्याने नदीच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या धरणाच्या स्वयंचलित दरवाजमधून 1400 क्यूसेक तर कृत्रिम दरवाजा मधून 1400 असा एकूण 2800 क्यूसेक इतका विसर्ग सुरू आहे. विशेष म्हणजे स्वयंचालित दरवाजे उघडण्याची उत्सुकता कोल्हापूरकरांना कायम असते. हे दरवाजे उघडले की वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटल्याचे संकेत कोल्हापूरकरांना मिळतात. असे असले तरी कोल्हापूरकरांच्या मनात गेल्या वर्षीच्या महापुराची भीती कायम आहे. त्यामुळे यंदा कोल्हापूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

हे सात दरवाजे म्हणजे राधानगरी धरणाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. भारतरत्न एम. विश्‍वेश्‍वरय्या यांनी या दरवाजाची रचना केली. धरण भरले की पाण्याचा दाब या दरवाजावर पडतो. दरवाजा आपोआप उचलला जातो. पाठोपाठ पाण्याचा विसर्ग सुरू होतो आणि धरणावरचा पाण्याचा अतिरिक्त दाब कमी होतो, अशी या स्वयंचलित दरवाजाची रचना आहे.

राधानगरी धरण म्हणजे कोल्हापूरच्या हिरव्यागार शेतीचे गमक आहे. हे धरण राजर्षी शाहू महाराजांनी बांधले नसते तर पाऊस जसा पडला असता तसा वाहून गेला असता आणि जिल्ह्याच्या पाचवीला दुष्काळ पुजला असता. पण, शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून 1902 मध्ये या धरणाची भोगावती नदीवर फेजिवडे येथे उभारणी सुरू झाली. असंख्य अडचणींना तोंड देत 1952 च्या आसपास धरणाची उभारणी पूर्ण झाली आणि पिण्याच्या, पिकासाठीच्या पाण्याची त्या वेळच्या परिस्थितीत चिंता मिटली. या धरणाचे बांधकाम रेंगाळत झाले असले तरीही धरणाच्या पायात शिसे ओतून पाया भक्कम करण्यात आला. धरणाचे काम दर्जेदार व्हावे म्हणून खूप कसोट्या लावण्यात आल्या. शाहू महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी धरणाचे काम पूर्णत्वास नेले. दाजीराव अमृतराव विचारे यांच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण झाले. आणि त्यांचे नाव या परिसरातील एका वाडीस दाजीपूर असे देण्यात आले.

कोयनेतून विसर्गापूर्वी पूर्व सूचना दिली जाईल

आज संध्याकाळी 6 वाजता कोयना धरणामध्ये 67.27 टीएमसी पाणीसाठा आहे. धरण परिचलन सूची नुसार कोयना धरणातील पाणीसाठा 80 टीएमसीच्या वर गेल्या नंतरच कोयना धरणातून कोयना नदीमध्ये विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला जाईल. सध्या गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पाऊस व पाण्याची आवक कमी आहे. विसर्गाबाबत प्रशासन व प्रसारमाध्यमे यांना पूर्व सूचना दिली जाईल अशी माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.

Satej Patil Kolhapur | स्थलांतर करायला सांगितल्यावर उशीर करू नका, सूचनांचं पालन करा - सतेज पाटील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget