एक्स्प्लोर
Advertisement
अहो आश्चर्यम्... साताऱ्याच्या जुळ्या भावांना तर बदलापूरच्या जुळ्या बहिणींना दहावीत गुणही 'जुळेच'!
दोघा जुळ्यांच्या सेम दिसण्यामुळं गावात कौतुकाचा भाग होता मात्र सध्या या जुळ्या भावंडांनी आता घरातल्यांना, गावातल्यांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सातारा : साताऱ्यातील दुष्काळी भागातील मान तालुक्यातील दोन जुळ्या भावंडांनी दहावीच्या परिक्षेत सर्वांना चांगलाच धक्का दिला आहे. शैलेश काळेल आणि योगेश काळेल या जुळ्यांना दहावीच्या परीक्षेत गुण देखील जुळेच मिळाले आहेत. या दोघांनी लहानपणी घरातल्यांना आणि शाळेतल्या शिक्षकांना नाकीनऊ केलं होतं. कारण दोघं दिसायला एक सारखेच.
एकाने चूक करायची आणि दुसऱ्याला शिक्षा मिळायची. दोघा जुळ्यांच्या सेम दिसण्यामुळे गावात कौतुकाचा विषय होता. मात्र सध्या या जुळ्या भावंडांनी आता घरातल्यांना, गावातल्यांना नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का दिला आहे. या दोघा जुळ्या भावंडांना दहावीत 'सेम टू सेम' टक्केवारी घेतली आहे.
शैलेश आणि योगेश या दोघांनाही 77. 40 टक्के गुण मिळाले आहेत. शैलेशला मराठीत 60, हिंदीत 85, इंग्रजीत 67, गणितात 83, विज्ञानात 59 आणि इतिहासात 89 गुण मिळाले आहे. तर योगेशला मराठीत 70, हिंदीत 82, इंग्रजीत 61, गणितात 69, तर विज्ञानात 78 आणि इतिहासात 88 गुण मिळाले आहेत.
या दोघांची शाळाही वेगवेगळी होती. दोघांच्या खोड्या एकमेकांवर यायला लागल्यामुळे घरातल्यांनी या दोघांची पाचवीपासून फाटाफूट केली आणि दोघांना वेगवेगळ्या शाळेत घातलं. आता या दोघांच्या सेम टू सेम दिसण्याबरोबर सेम टू सेम गुणांचीही चर्चा आहे.
बदलापूरच्या जुळ्या बहिणींना सेम टू सेम मार्क्स
दुसरीकडे बदलापूरच्या दोन जुळ्या बहिणींची देखील मोठी चर्चा सुरु आहे. कारण या बहिणींनाही अगदी सेम टू सेम गुण मिळाले आहेत. रिद्धी आणि सिद्धी व्यापारी अशी या जुळ्या बहिणींची नावं असून त्या बदलापूरजवळच्या आंबेशिव गावात राहतात. शनिवारी दहावीचा निकाल लागल्यानंतर या दोघींनाही 600 पैकी 420 गुण मिळाल्याचं समजलं आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण पसरलं.
या दोघींच्या घरची परिस्थिती बेताची असून त्यांनी एकाच पुस्तकावर दहावीचा अभ्यास केला होता. तर गावातल्याच एका ट्रस्टच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या सानेगुरुजी विद्यालयात त्या शिक्षण घेत होत्या. मात्र त्यातूनही त्यांनी चिकाटीने अभ्यास करत 84 टक्क्यांचा पल्ला गाठल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पुढे कॉमर्सचं शिक्षण घेऊन बँकेत अधिकारी बनण्याचं त्यांचं स्वप्न आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नागपूर
भंडारा
Advertisement