3 लाख दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला योजनेचा लाभ; पुण्यातील चितळेंकडून तुकाराम मुंडेंचा मंत्रालयात सत्कार
बाजारात दुध उत्पादक कंपन्यांच्या दुध पिशव्यांचे दर वाढले असून शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळत नसल्याची ओरड सातत्याने होत असते
पुणे : राज्य सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmer) राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला होता. दुधाला अनुदान देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीतच हा निर्णय झाल्यानंतर सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपयांचं अनुदान जाहीर केलं. त्यामुळे पाच रुपयांच्या सबसिडीसह दूध (Milk) उत्पादक शेतकऱ्यांना 32 रुपयांचा दर मिळणण्यास आता सुरुवात झाली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरलेल्या या निर्णयाची अंमलबजावणीस पारदर्शक आणि गतीमानतेने होत आहे. या विभागाचे सचवि तुकाराम मुंडेंच्या गतीमान व नियोजनबद्धतेमुळे मागील दोन महिन्यात 3 लाख शेतकऱ्यांना 226 कोटी रुपयांच्या सबसिडीचं वाटप करण्यात आलं आहे. त्यामुळे, विविध दुध संघाच्या मालकांनी एकत्र येत तुकाराम मुंडेंचा सत्कार केला.
बाजारात दुध उत्पादक कंपन्यांच्या दुध पिशव्यांचे दर वाढले असून शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळत नसल्याची ओरड सातत्याने होत असते. त्यासाठी, दुध उत्पादक शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनांनी आंदोलनेही केली आहेत. शेतकऱ्यांच्या दुधाला जादा भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होती होती. या मागणीचा विचार करुन राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. गेल्या 3 महिन्यांपासून शेतकऱ्यांना या अनुदान योजनेचा लाभ मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या दुधाला 5 रुपयांची सबसिडी योजना पारदर्शक व गतीमानतेने पूर्ण झाल्याने दुध विक्रेत्यांमध्येही समाधान आहे. या योजनेच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यांत 3 लाख शेतकऱ्यांना 226 कोटी रुपयांच्या सबसिडीचं वाटप करण्यात आलं. पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती 5 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आता, पारदर्शकपणे व वेगवान कालावधीत हे पैसे शेतकरी व दुध उत्पादकांच्या खात्यात जमा झाले आहेत. पहिल्यांदाच अशी योजना राबवल्यामुळे चितळे दूध, थोरात दूध,ऊर्जा दूध आणि इतर दुध संघांनी एकत्र येऊन या विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे मंत्रालयात जाऊन आभार मानले, तसेच त्यांचा सत्कारही केला.
योजनेत कुठलीही अनियमितता नाही
सरकारने जनावरांसाठी लागू केलेल्या एअर टॅग पद्धतीमुळे या अनुदान योजनेत कोणतीही अनियमितता आणि अपहार झाला नसल्याचा दावा दुध संघ आणि तुकाराम मुंढे यांनी केला आहे. आपल्या धडाकेबाजी कामगिरीने सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी सोलापूर, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड येथील दमदार कामगिरीतून जनसामान्यांत वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच, मुंडेंच्या बदलीनंतर अनेकांनी रस्त्यावर उतरुन सरकारच्या निर्णयाचा विरोध केला होता. आपल्या कामाच्या स्टाईलने अनेकदा वादग्रस्त ठरलेले तुकाराम मुंढेंमुळे बळीराजाला योजनेचा लाभ लवकर मिळालाय. त्यामुळे, दुध संघाच्या वतीने तुकाराम मुंडेंचा सत्कार करुन त्यांचे आभार मानण्यात आले.