एक्स्प्लोर
रत्नागिरीजवळच्या आंबेनळी घाटात 800 फूट दरीत ट्रक कोसळला
रत्नागिरी येथील आंबेनळी घाटात ट्रक दरीत कोसळून अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक सुमारे 800 फूट खोल दरीत कोसळला.

रत्नागिरी : रत्नागिरी येथील आंबेनळी घाटात ट्रक दरीत कोसळून अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक सुमारे 800 फूट खोल दरीत कोसळला. मदतकार्यासाठी पोलीस आणि ट्रेकर्स घटनास्थळी दाखल झाले असून ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेच. ट्रकवरचे नियंत्रण सुटल्याचा ट्रल चालक आणि क्लिनरला अंदाज आल्यामुळे त्या दोघांनी ट्रक दरीत कोसळण्याआधीच ट्रकबाहेर उडी मारली. चालक आणि क्लिनर दोघेही जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. कृषी विद्यापीठाची बस ज्या ठिकाणाहून बस दरीत गेली त्याच ठिकाणावरुन हा ट्रकदेखील दरीत कोसळला आहे. अंबेनळी घाटात प्रवाशांसह कार दरीत कोसळली, पोलिस घटनास्थळाकडे रवाना मी कसा वाचलो, मरणाच्या दाढेतून वाचलेले प्रकाश सावंत देसाईंचा थरार
आणखी वाचा























