एक्स्प्लोर

Truck Drivers Protest: ट्रक चालकांच्या संपानंतर आता लालपरीचा मोठा निर्णय, ST बस सुरळीत धावणार

Truck Drivers Protest : नांदेडच्या आगारात 45 हजार लिटर डिझेल उपलब्ध असून त्याद्वारे आगामी दहा दिवस एसटीची नियोजित वाहतूक सुरळीत धावू शकते असे आगार प्रमुखानी एबीपी  माझाशी बोलताना स्पष्ट केलय. 

नांदेड  :  हिट अँड रन कायद्याविरोधात (Hit and Run New Law)  ट्रक- टँकर चालक संपावर गेले  आहेत.  त्यामुळे इंधनाचा तुटवडा होईल या भीतीने वाहनधारकांनी इंधन भरून घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र सर्वत्र आहे. या संपाचा फटका एसटी (ST Bus)  वाहतुकीवरही फटका बसण्याची शक्यता आहे.  मात्र लालपरी या संपातही दहा दिवस तग धरू शकेल इतका इंधनसाठा नांदेडमध्ये आहे. नांदेडच्या आगारात 45 हजार लिटर डिझेल उपलब्ध असून त्याद्वारे आगामी दहा दिवस एसटीची नियोजित वाहतूक सुरळीत धावू शकते असे आगार प्रमुखानी एबीपी  माझाशी बोलताना स्पष्ट केलय. 

विदर्भातील सर्व डेपो मिळून साडे सहा लाख लिटर डिझेल उपलब्ध

एसटी बससाठी लागणारे डिझेल सध्या ऑईल कंपन्यांच्या डेपोमधून मिळत नसल्यामुळे पोलीस सुरक्षेमध्ये तो डिझेल एसटीच्या विविध डेपोपर्यंत आणण्याचा एसटी प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी एसटी प्रशासनानं पोलीस स्टेशनला पत्र दिल्याची माहिती एसटीचे विदर्भ उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभने यांनी दिली आहे. एसटी बसेस साठी विदर्भात रोज दोन लाख लिटर डिझेल लागते. सध्या विदर्भातील सर्व डेपो मिळून साडे सहा लाख लिटर डिझेल उपलब्ध आहे. त्यामुळे तीन दिवस एसटी सुरळीत धावू शकेल अशी स्थिती असल्याचे गभने म्हणाले. मात्र, नागपूर जिल्ह्यात एक दिवस पुरेल एवढंच डिझेल साठा असल्याने नागपुरातून दुसऱ्या जिल्ह्यात धावणाऱ्या एसटींना तिथून डिझेल भरून येण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

सध्या एसटीची काय स्थिती? 

  • सध्या एसटीच्या दररोज सरासरी 14 हजार बसेस धावतात. 
  • या बसेस साठी दररोज सरासरी 11 लाख लिटर डिझेल लागते.
  • एसटीच्या 250 डेपो मध्ये डिझेल भरण्याची सोय आहे. 
  •  इंडियन ऑइल कार्पोरेशन(IOC) व भारत पेट्रोलियम(BPCL) या दोन पेट्रोल केमिकल कंपन्यांच्या कडून एसटी महामंडळ डिझेल खरेदी करते. 
  • सर्व आगारात आजच्या दिवस पुरेल इतका डिझेल साठा सध्या आहे.
  • संप आणखीन काही दिवस चालल्यास डिझेलचे कमतरता भासून बस फेऱ्या रद्द होऊ शकतात.

एसटीच्या सर्व आगारांमध्ये किमान दोन दिवस पुरेल इतका इंधन साठा

सध्या राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये कमीत कमी दोन दिवस पुरेल इतका इंधन साठा आहे. ट्रक आणि टँकर चालकांचा संप आणखी दोन दिवस चालला तर नक्कीच सर्वसामान्यांचा प्रवासाचा माध्यम असलेल्या एसटीची चाके थांबतील अशी चिन्हे आहेत.   त्यामुळे देवदर्शनावरुन परतणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. 

हे ही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget